भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघांत एकेक बदल पाहायला मिळाला. भारताने हनुमा विहारीच्या जागी उमेश यादवला संधी दिली. भारतीय संघ तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. दुसरीकडे आफ्रिकेनंही तीन जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी डेन पिएडला बाकावर बसवले अन् अॅनरिच नोर्त्जेला पदार्पणाची संधी दिली. आफ्रिकेकडून कसोटीत पदार्पण करणारा तो 337वा खेळाडू ठरला.
25 वर्षीय नोर्त्जे सातत्यानं 145 kmph च्या वेगानं मारा करतो. मार्च 2019मध्ये त्यानं आफ्रिकेकडून वन डे संघात पदार्पण केले. त्यानंतर त्याचा वर्ल्ड कप संघातही समावेश करण्यात आला होता, परंतु दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. 18 सप्टेंबर 2019मध्ये भारताविरुद्ध ट्वेंटी-20 सानम्यात पदार्पण केले. नोर्त्जेच्या नावावर 47 प्रथम श्रेणी सामने आहेत आणि त्यात त्यानं 25.72च्या सरासरीनं 162 विकेट्स घेतले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 लाखात आपल्या चमूत दाखल करून घेतले.
विराट कोहलीचं अर्धशतक; गांगुलीचा विक्रम मोडलाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीवर पावसाचे सावट दूर झाले आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही लढत होणार आहे. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताला 203 धावांनी विजय मिळवून दिला. या कसोटीत मैदानावर उतरताच कर्णधार विराट कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा पन्नासावा सामना ठरला आहे. त्यानं या कामगिरीसह माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 49 सामन्यांचा विक्रम मोडला. या विक्रमात महेंद्रसिंग धोनी 60 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. धोनीनं 60 सामन्यांत 27 विजय मिळवले आहेत. कोहलीनं 49 सामन्यांपैकी 29 विजय मिळवून धोनीला मागे टाकले आहे.