पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : पंचांनी आऊट दिल्यावर फलंदाज पॅव्हेलियनमध्ये जातो. कारण पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो. पण पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पंचांनी आऊट दिल्यानंतरही द्विशतकवीर विराट कोहली खेळतच असल्याचे पाहायला मिळाले.
विराटने सात हजार धावांसह आपले सातवे द्विशतक साजरे केले. त्यानंतर 208 धावांवर असताना कोहलीला मैदानावरील पंचांनी आऊट दिले. फिरकीपटू केशव महाराजच्या गोलंदाजीवर फॅफ ड्यू प्लेसिसने कोहलीचा झेल टिपला. कोहली बाद झाल्याचे सर्वांनाच समजले. द्विशतकावंतर कोहली झटपट बाद झाल्याने चाहते नाराज झाले होते. पण आऊट दिल्यानंतरही त्यानंतर कोहली खेळत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
पंचांनी कोहलीला आऊट दिले खरे. पण त्यानंतर पंचांना नो बॉल चेक केला. त्यावेळी केशव महाराजने नो बॉल टाकल्याचे पाहायला मिळाले आणि कोहलीला नाबाद ठरवण्यात आले. त्यामुळे कोहली पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झाला.
कोहली जैसा कोई नहीं; सचिन आणि सेहवागला टाकले मागेभारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या एका द्विशतकाच्या जोरावर कोहलीने माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे.
विराट कोहलीने या सामन्यात सात हजार धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील सात हजार धावांसह कोहलीने सातवे द्विशतकही झळकावले आहे. भारताकडून सर्वाधिक द्विशतके सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होती. या दोघांनी सहा द्विशतके झळकावली होती. पण कोहलीने या सामन्यात सातवे द्विशतक झळकावले आणि या दोघांनाही पिछाडीवर सोडले.
ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराबरोबर कोहलीने केली बरोबरीभारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एका महान कर्णधाराशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणजे रिकी पाँटिंग. कसोटी क्रिकेटमध्ये पाँटिंगने 26 शतके लगावली होती. कोहलीने आज 26वे शतक झळकावत पाँटिंगच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
भारताच्या इतिहासातील कोहली ठरला सर्वोत्तम क्रिकेटपटू, सचिनलाही पिछाडीवर टाकलेभारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. कोहलीने यावेळी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर टाकले आहे.
पुण्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील कोलहीचे हे 26वे शतक ठरले. कोहलीने 173 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केले. उपहाराच्यावेळी कोहलीने 182 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 सामने खेळले. या 200 सामन्यांमध्ये सचिनने 53.78 च्या सरासरीने 15921बनवले आहेत. कोहलीने आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम नोंदवला आहे. कोहलीने जेव्हा 104 धावा केल्या तेव्हा त्याने 6904 धावा केल्या होत्या, यावेळी त्याची सरासरी होती 53.93.