Join us  

India vs South Africa, 2nd Test : टीम इंडियामुळे 11 वर्षांनंतर आफ्रिकेवर ओढावली नामुष्की

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांचे पारडे जड झाले आहे. भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला आणि आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:14 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांचे पारडे जड झाले आहे. भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला आणि आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळला. रविवारी कसोटीच्या चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीनं आफ्रिकेला फॉलोऑन दिला, अन् पहिल्याच षटकात इशांत शर्मानं पाहुण्यांना धक्का दिला. इशांतने एडन मार्करामला शून्यावर पायचीत केले. त्यानंतर उमेश यादवनंही डी ब्रूयनला बाद केले. या सामन्यात टीम इंडियामुळे आफ्रिकेवर 11 वर्षांनंतर नामुष्की ओढावली आहे.

कोहलीला आतापर्यंत 14वेळा फॉलोऑन देण्याची संधी मिळाली आणि त्यात त्यानं 7 वेळा फॉलोऑन दिला. त्यापैकी चार सामने जिंकले आणि दोन सामने पावसामुळे अनिर्णीत राहिले. पण, कोहलीनं आज आफ्रिकेला फॉलोऑन देऊन नवा विक्रम नोंदवला. आफ्रिकेला 11 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या संघानं फॉलोऑन दिला आहे. यापूर्वी 2008मध्ये इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत आफ्रिकेला फॉलोऑन दिला होता. त्यात ग्रॅमी स्मिथ, नेल मॅककेंझी आणि हाशीम आमला यांनी खिंड लढवत सामना अनिर्णीत राखला होता.

 

कोहली ‘विराट’ फलंदाज, प्रगल्भ कर्णधारविराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार अर्धशतक झळकावले. त्याची आकडेवारी ही विस्मयचकित करणारी आहे. तो आणखी किती पुढे जाऊ शकेल हे आता पाहणे आगामी काळात रंजक ठरेल. मी विचार करतो की, त्याच्या उर्वरित कारकिर्दीत हा प्रश्न वारंवार विचारला जाईल. त्याने आता ७ हजार धावांचा टप्पा मागे टाकला. कसोटीतील धावा आणि शतके यांच्या बाबतीत तो आता सचिन तेंडुलकरच्या विक्रमांच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

कोहली ३१ वर्षांचा पूर्ण व्हायला अजून एक महिना आहे. तो ७ ते ८ वर्षे शानदार क्रिकेट खेळू शकतो. त्याचा फिटनेस, त्याच्यात असलेली तीव्र महत्त्वाकांक्षा, खेळाबद्दल असलेली निष्ठा यामुळे तो आणखी खूप काही साध्य करू शकतो. तो सध्या तिन्ही प्रारूपात सर्वोत्तम खेळाडू आहे.विराट कोहलीची स्पर्धा आता जो रुट, स्टिव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांच्यासोबत आहे. हे त्याच्या बरोबरीचे समकालीन सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेत. कोहलीचे २६ वे शतक हे त्याचे सातवे दुहेरी शतक होते. २०१६ पासून हे त्याच्या कारकिर्दीचा प्रगतीचा आलेख दर्शविते.दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजी आक्रमण हे नक्कीच शानदार होते. तरीही ही फारशी शानदार खेळी मानली जाऊ शकत नाही.

कोहलीने कर्णधार म्हणूनदेखील चांगले निर्णय घेतले. तो सहजपणे तिहेरी शतक पूर्ण करू शकत होता. मात्र, त्याने त्याऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना दिवसाच्या अखेरच्या टप्प्यात फलंदाजीस बोलावून बळी मिळविण्याचा निर्णय घेतला. तो कर्णधार म्हणूनदेखील प्रगल्भ असल्याचे त्याने दाखवून दिले. या मालिकेच्या आधी शास्त्री यांनी मला सांगितले होते की, त्याच्यात एक अंत:प्रेरणा आहे. त्यामुळे तो कायमच शिकत असतो. स्टिव्ह स्मिथचे अ‍ॅशेजमधील यशामुळे सर्वोत्तम होण्यासाठी तो नक्कीच त्याचा फॉर्म उंचावेल.’स्वत:ला सर्वोत्कृष्ट म्हणून सिद्ध करण्यासाठी कोहली याने नक्कीच यशस्वी प्रयत्न केले आहेत. तो एक कर्णधार म्हणूनदेखील प्रगल्भ होत आहे.- अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहली