भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी मजबूत पकड बनवली आहे. चहापानापर्यंत भारतीय संघाने 2 विकेट गमावत 168 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा आज अपयशी ठरला असला तरी मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना संघाला मजबूत स्थितित आणले. या दोघांनी भागीदारी आफ्रिकेच्या कागिसो रबाडानं संपुष्टात आणली. पण, मयांकने खिंड लढवताना सलग दुसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली. या कामगिरीसह त्यानं 10 वर्षांपूर्वीचा विरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली.
जसप्रीत बुमराहच्या विक्रमावर कागिसो रबाडाचा 'Strike'
मयांकने 188 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 105 धावा केल्या. पहिल्या कसोटीत मयांकने द्विशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी 2009-10मध्ये विरेंद्र सेहवागनं 2009-10 च्या मालिकेत आफ्रिकेविरुद्ध 109 आणि 165 धावांची खेळी केली होती. शिवाय आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मोहम्मद अझरुद्दीन ( 1996), विरेंद्र सेहवाग ( 2010), सचिन तेंडुलकर ( 2010) यांनी अशी कामगिरी केली आहे.
मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला खतरनाक बाऊन्सर, Video
विराट कोहलीचं अर्धशतक; गांगुलीचा विक्रम मोडला
आफ्रिकेनं खेळला डाव, KKRच्या खेळाडूला उतरवले मैदानात