सेन्चुरियन - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारतानं दक्षिण आफ्रिकेला 6 बाद 269 धावांवर रोखले आहे. रवीचंद्रन अश्विनच्या उत्तम खेळीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 269 धावांत रोखलं. पहिल्या दोन्ही सत्रात वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. रवीचंद्रन अश्विनने तीन विकेट्स घेतल्या. शिवाय, इशांत शर्माने एक विकेट घेतली. त्यानंतर हार्दिक पंड्याने हाशिम आमलाला रनआऊट केले सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रमने 15 चौकारांसह 94 धावांची खेळी उभारली. तर हाशिम आमलाने 82 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी कर्णधार फाफ ड्यू प्लेसी 24 आणि केशव महाराज 10 धावांवर खेळत होते.
पहिला कसोटी सामना गमावला असला तरी भारताला अद्याप संधी -सुनील गावसकर
पहिला कसोटी सामना गमावला असला तरी भारताला अद्याप मालिका विजयाची संधी आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते, पण भारतीय संघाने दोन वर्षापूर्वी श्रीलंकेत अशी कामगिरी केलेली असून पुन्हा अशी कामगिरी करण्यास सक्षम आहे. दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण आफ्रिकेत पराभवाचे स्वप्न साकार करण्यासाठी फलंदाजांना आता कंबर कसावी लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात कचखाऊ फलंदाजीमुळेच भारताला पराभव स्वीकारावा लागला. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नसली तरी येथे फलंदाजी करणे अशक्य नक्कीच नव्हते. भारतीय फलंदाजांच्या देहबोलीचे अवलोकन त्यांच्या पायाच्या हालचालीवरून दिसून आले. ते थकलेले दिसले. स्विंग माºयापुढे ते हतबल झालेले दिसले. दोन्ही डावात स्विंग होणाºया चेंडूंचा पाठलाग करताना बाद झाल्याचे निदर्शनास आले. दुसºया कसोटीत भारतीय फलंदाजांनी मरगळ झटकून खेळपट्टीवर ठामपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास दाखवायला हवा.भारतीय संघाचा थिंग टँक काहीही विचार करत असो, पण टीम इंडियाने सराव सामने खेळायला हवे होते. त्याचे कारण असे की भारतीय संघ उपखंडाबाहेर पहिल्या कसोटी सामन्यात संघर्ष करीत असल्याचा इतिहास आहे.