भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मानं विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत प्रथमच सलामीला येताना दोन्ही डावांत शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले. त्याच्या या खेळीवर सर्व स्तरातून कौतुक झालं. त्यामुळे पुण्यातील कसोटीतही त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. सामन्याच्या पुर्वसंध्येला कर्णधार विराट कोहलीलाही रोहितच्या खेळीबद्दल विचारण्यात आले, त्यावर कोहलीनं दिलेलं उत्तर एकण्यासारखं आहे...
पहिल्या कसोटीत रोहितनं पहिल्या डावात 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्यानं 149 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकार खेचून 127 धावांची खेळी केली. त्यानं दोन्ही डावांत मिळून एकूण 303 धावा केल्या आणि त्यात 33 चौकार व 13 षटकारांचा समावेश आहे. एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. सलामीवीर म्हणून एकाच सामन्यात दोन्ही डावांत सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यानंतर राहुल द्रविड (2), रोहित ( 1), विराट कोहली ( 1), अजिंक्य रहाणे ( 1) आणि विजय हझारे ( 1) यांचा क्रमांक येतो.
दुसऱ्या कसोटीच्या पुर्वसंध्येला कोहली म्हणाला,'' रोहितसारखा फलंदाज सलामीला असेल आणि त्याच्याकडून मोठी खेळी होत असेल, तर संघावरील दडपण नक्कीच कमी होत. अशी खेळीनं संघाच्या विजयाच्या संधीही वाढते. पहिल्या कसोटीतील त्याच्या कामगिरीवर आम्ही सर्वच खूश आहोत. आता ती वेळ आलीय की त्याचा तळाच्या क्रमवारीतून सलामीसाठी विचार करायला हवा. त्याला त्याच्या फलंदाजीचा मनसोक्त आनंद लुटण्याची संधी द्यायला हवी.''
Web Title: India vs South Africa, 2nd Test: Time to let Rohit Sharma enjoy his batting in red ball cricket, say Virat kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.