Join us  

India vs South Africa, 2nd Test : विराट कोहलीने मोडला भारताच्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारताचे कर्नल कोण आणि कोणता विक्रम...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 11:07 AM

Open in App

पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा कर्णधार विराट कोहलीने पुण्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली. ही फलंदाजी करताना कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडल्याचेही पाहायला मिळाले.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले होते. पण त्यावेळी कोहली या विक्रमापासून थोडा लांब होता. पण दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करत कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारताचे कर्नल कोण आणि कोणता विक्रम...

भारताचे कर्नल म्हणजे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर. कसोटी कारकिर्दीमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत 6868 धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज दमदार फलंदाजी करत वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका