पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. कोहली हा धावांचा डोंगर नेहमीत उभारतो. पण या वर्षात मात्र कोहलीला जास्त धावा करता आलेल्या नाही. या सामन्यापूर्वी कोहलीने बरेच विक्रम केले, पण एक गोष्ट मात्र त्याला करता आली नव्हती.
यंदाच्या वर्षात भारताने जवळपास सर्वच सामने जिंकले आहेत. पण कोहलीला मात्र या वर्षात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोहली हा सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडेल, असे बऱ्याच जणांना वाटते. पण कोहलीला या वर्षात एकही कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते.
या वर्षात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळला. या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने दोन अर्धशतके झळकावली. या चार सामन्यांमध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या 76 आहे. त्यामुळे या वर्षातील त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले आहे.
विराट कोहलीने मोडला भारताच्या कर्नलांचा विक्रमभारताचा कर्णधार विराट कोहलीने पुण्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली. ही फलंदाजी करताना कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडल्याचेही पाहायला मिळाले.
या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले होते. पण त्यावेळी कोहली या विक्रमापासून थोडा लांब होता. पण दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करत कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारताचे कर्नल होण आणि कोणता विक्रम...
भारताचे कर्नल म्हणजे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर. कसोटी कारकिर्दीमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत 6868 धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज दमदार फलंदाजी करत वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.