Join us  

India vs South Africa, 2nd Test : दुसऱ्या दिवसावर विराटराज; भारताकडे 565 धावांची आघाडी

कोहलीने नाबाद 254 धावांची खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभारता आला. भारताच्या गोलंदाजांनीही अचूक मारा केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 36 अशी बिकट अवस्था आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 5:08 PM

Open in App

पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. कोहलीने नाबाद 254 धावांची खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभारता आला. भारताच्या गोलंदाजांनीही अचूक मारा केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 36 अशी बिकट अवस्था आहे.

आजचा दिवस हा कोहलीच्याच नावावर राहीला. कोहलीने आज कसोटी कारकिर्दीतील सातवे द्विशतक झळकावले, त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा टप्पाही कोहलीने यावेळी गाठला. रवींद्र जडेजाचे शतक यावेळी फक्त 9 धावांची हुकले. जडेजाने 8 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 91 धावांची खेळी साकारली. अजिंक्य रहाणेने 59 धावा केल्या.

भारताच्या गोलंदाजांनीही यावेळी भेदक मारा केला. दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 36 अशी स्थिती आहे. भारतीय संघ अजूनही 565 धावांनी आघाडीवर आहे.

द्विशतकवीर विराट कोहलीचे सर्व विक्रम, फक्त एका क्लिकवरभारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात सात हजार धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील सात हजार धावांसह कोहलीने सातवे द्विशतकही झळकावले आहे. कोहलीने आज कोण कोणते विक्रम मोडले, पाहा फक्त एका क्लिकवर...

विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासह सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही कोहलीने पिछाडीवर सोडले.

सचिन आणि सेहवाग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सहा द्विशतके लगावले होते. कोहलीने या सामन्यात सातवे द्विशतक झळकावले.

भारताकडून सर्वाधिक द्विशतके लगावण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर असेल.

कोहलीने सातव्या द्विशतकासह सात हजार धावाही पूर्ण केल्या.

सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 सामने खेळले. या 200 सामन्यांमध्ये सचिनने 53.78 च्या सरासरीने 15921बनवले आहेत. कोहलीने आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम नोंदवला आहे. कोहलीने जेव्हा 104 धावा केल्या तेव्हा त्याने 6904 धावा केल्या होत्या, यावेळी त्याची सरासरी होती 53.93.

कसोटी कारकिर्दीमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत 6868 धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज दमदार फलंदाजी करत वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एका महान कर्णधार रिकी पाँटिंगशी बरोबरी केली आहे.

विराट कोहलीने मोडला स्वत:चाच विक्रमभारताचा कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या द्विशतकासह सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही कोहलीने पिछाडीवर सोडले. पण या सामन्यात कोहलीने स्वत:चाच विक्रम मोडीत काढल्याचेही पाहायला मिळाले.

विराट कोहलीने या सामन्यात सात हजार धावा पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमधील सात हजार धावांसह कोहलीने सातवे द्विशतकही झळकावले आहे. भारताकडून सर्वाधिक द्विशतके सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होती. या दोघांनी सहा द्विशतके झळकावली होती. पण कोहलीने या सामन्यात सातवे द्विशतक झळकावले आणि या दोघांनाही पिछाडीवर सोडले.

द्विशतक झळकावल्यावर विराटला 208 धावांवर असताना जीवदान मिळाले. पण त्यानंतर कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करत आपल्या 250 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीची 243 ही सर्वोत्तम धावसंख्यो होती. त्यामुळे या खेळीत विराटने आपलाच विक्रम मोडीत काढला असून तो पहिले त्रिशतक झळकावतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंचांनी आऊट देऊनही विराट द्विशतकानंतर खेळतच राहीलापंचांनी आऊट दिल्यावर फलंदाज पॅव्हेलियनमध्ये जातो. कारण पंचांचा निर्णय अंतिम मानला जातो. पण पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पंचांनी आऊट दिल्यानंतरही द्विशतकवीर विराट कोहली खेळतच असल्याचे पाहायला मिळाले.

विराटने सात हजार धावांसह आपले सातवे द्विशतक साजरे केले. त्यानंतर 208 धावांवर असताना कोहलीला मैदानावरील पंचांनी आऊट दिले. फिरकीपटू तेशव महाराजच्या गोलंदाजीवर फॅफ ड्यू प्लेसिसने कोहलीचा झेल टिपला. कोहली बाद झाल्याचे सर्वांनाच समजले. द्विशतकावंतर कोहली झटपट बाद झाल्याने चाहते नाराज झाले होते. पण आऊट दिल्यानंतरही त्यानंतर कोहली खेळत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

पंचांनी कोहलीला आऊट दिले खरे. पण त्यानंतर पंचांना नो बॉल चेक केला. त्यावेळी केशव महाराजने नो बॉल टाकल्याचे पाहायला मिळाले आणि कोहलीला नाबाद ठरवण्यात आले. त्यामुळे कोहली पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झाला.

कोहली जैसा कोई नहीं; सचिन आणि सेहवागला टाकले मागेभारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. या एका द्विशतकाच्या जोरावर कोहलीने माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधाराबरोबर कोहलीने केली बरोबरीभारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक पूर्ण केले. या शतकासह कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या एका महान कर्णधाराशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणजे रिकी पाँटिंग. कसोटी क्रिकेटमध्ये पाँटिंगने 26 शतके लगावली होती. कोहलीने आज 26वे शतक झळकावत पाँटिंगच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारताच्या इतिहासातील कोहली ठरला सर्वोत्तम क्रिकेटपटू, सचिनलाही पिछाडीवर टाकलेभारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. कोहलीने यावेळी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर टाकले आहे.

पुण्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमधील कोलहीचे हे 26वे शतक ठरले. कोहलीने 173 चेंडूंमध्ये हे शतक पूर्ण केले. उपहाराच्यावेळी कोहलीने 182 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 सामने खेळले. या 200 सामन्यांमध्ये सचिनने 53.78 च्या सरासरीने 15921बनवले आहेत. कोहलीने आतापर्यंतच्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक सरासरीचा विक्रम नोंदवला आहे. कोहलीने जेव्हा 104 धावा केल्या तेव्हा त्याने 6904 धावा केल्या होत्या, यावेळी त्याची सरासरी होती 53.93.

विराट कोहलीने या वर्षात पहिल्यांदा 'ही' गोष्ट केलीसध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. कोहली हा धावांचा डोंगर नेहमीत उभारतो. पण या वर्षात मात्र कोहलीला जास्त धावा करता आलेल्या नाही. या सामन्यापूर्वी कोहलीने बरेच विक्रम केले, पण एक गोष्ट मात्र त्याला करता आली नव्हती.

यंदाच्या वर्षात भारताने जवळपास सर्वच सामने जिंकले आहेत. पण कोहलीला मात्र या वर्षात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोहली हा सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडेल, असे बऱ्याच जणांना वाटते. पण कोहलीला या वर्षात एकही कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नव्हते.

या वर्षात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळला. या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने दोन अर्धशतके झळकावली. या चार सामन्यांमध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या 76 आहे. त्यामुळे या वर्षातील त्याचे हे पहिले कसोटी शतक ठरले आहे.

विराट कोहलीने मोडला भारताच्या कर्नलांचा विक्रमभारताचा कर्णधार विराट कोहलीने पुण्यातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली. ही फलंदाजी करताना कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडल्याचेही पाहायला मिळाले.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावले होते. पण त्यावेळी कोहली या विक्रमापासून थोडा लांब होता. पण दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी करत कोहलीने भारताच्या कर्नलांचा विक्रम मोडीत काढला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भारताचे कर्नल होण आणि कोणता विक्रम...

भारताचे कर्नल म्हणजे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर. कसोटी कारकिर्दीमध्ये वेंगसरकर यांनी आतापर्यंत 6868 धावा केल्या होत्या. कोहलीने मात्र आज दमदार फलंदाजी करत वेंगसरकर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारवींद्र जडेजाअजिंक्य रहाणे