बंगळुरु, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी सध्या येऊन धडकली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तिसरा ट्वेन्टी-20 सामना बंगळुरु येथे होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा सामनाही धर्मशालासारखा रद्द होणार का, असा सवाल चाहत्यांच्या मनामध्ये आहे.
धर्मशाला येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पहिला ट्वेन्टी-20 सामना रद्द करावा लागला होता. कारण धर्मशाला येथे सतत तीन दिवस पाऊस सुरु होता. त्यामुळे मैदानातून पाणी काढणे शक्य होत नव्हते. त्याचबरोबर मैदानही निसरडे झाले होते. त्यामुळे धर्मशाला येथील सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
धर्मशालाचा सामना रद्द केल्यावर दुसरी लढत मोहाली येथे खेळवली गेली. या सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला होता. सध्याच्या घडीला भारतीय संघ मालिकेमध्ये 1-0 असा आघाडीवर आहे. त्यामुळे तिसरा सामना रद्द झाला तर भारताचा मालिका विजय होऊ शकतो.
संभाव्य संघभारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.
डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे सोपे वाटते, दीपक चहरटीम इंडियाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्स राखून विजय मिळवताना 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेच्या 5 बाद 149 असे आव्हान भारतीय संघाने 19 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. शिखर धवन ( 40) आणि कर्णधार विराट कोहली ( 72*) यांच्या दमदार खेळीनं हा विजय सोपा केला. गोलंदाजीत दीपक चहरने दोन विकेट्स घेत योगदान दिले.