बंगळुरु, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची फटकेबाजीची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. आफ्रिकेनं पहिल्याच षटकासाठी फिरकीपटू बीजॉर्न फॉर्टूइनला पाचारण केले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर धवनने चौकार खेचला आणि टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या चौकारासह धवनने एक विक्रम नावावर केला. शिवाय रोहित शर्मानेही कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धवनने 7000 धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो रोहित, कोहली आणि सुरेश रैना यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs South Africa, 3rd T20 : रोहित शर्मानं कॅप्टन कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; धवननेही विक्रम रचला
India vs South Africa, 3rd T20 : रोहित शर्मानं कॅप्टन कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; धवननेही विक्रम रचला
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 7:14 PM