बंगळुरु, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानाची शर्यत अशीच सुरू राहणार आहे. दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहलीनं हिटमॅन रोहितला मागे टाकले, पण आज रोहितनं 9 धावा करून अव्वल स्थान पुन्हा पटकावले. त्याचे हे अव्वल स्थान क्षणिक ठरले. तिसरी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. रोहितच्या नावावर 98 सामन्यांत 2443 धावा आहेत आणि कोहलीनं हा पल्ला ओलांडला आहे.
कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची फटकेबाजीची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. आफ्रिकेनं पहिल्याच षटकासाठी फिरकीपटू बीजॉर्न फॉर्टूइनला पाचारण केले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर धवनने चौकार खेचला आणि टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या चौकारासह धवनने एक विक्रम नावावर केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धवनने 7000 धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो रोहित, कोहली आणि सुरेश रैना यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ( 2283), पाकिस्तानचा शोएब मलिक (2263) आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 2140) अव्वल पाचमध्ये आहेत.
Web Title: India vs South Africa, 3rd T20 : Virat Kohli again overtake Rohit Sharma, became a highest run scorer in T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.