बंगळुरु: भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा धर्मशाला येथील पहिला ट्वेंटी- 20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यानंतर दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारताने विजयासह 3 सामनांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र बंगळुरु येथे रंगणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात देखील पावसाचे संकट असल्याचे बोलले जात आहे.
भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा पहिला ट्वेंटी- 20 सामना रद्द झाल्यानंतर दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यात देखील विजय मिळवून शेवट गोड करण्यासाठी भारत सज्ज असतानाच या सामन्यात पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे हा सामनाही धर्मशालासारखा रद्द होणार का, असा सवाल चाहत्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.
दरम्यान दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात शिखर धवन ( 40) आणि कर्णधार विराट कोहली ( 72*) यांच्या दमदार खेळीनं हा विजय सोपा केला. गोलंदाजीत दीपक चहरने दोन विकेट्स घेतल्या होत्या. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.
Web Title: India vs South Africa, 3rd T20I: Bad news for cricket lovers before the third Twenty20 match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.