India vs South Africa 3rd T20I Match Result : सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात २०० पारच्या लढाईत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला रोखून बाजी मारली. या सामन्यातील विजयासह भारतीय संघानं ४ सामन्यांच्या टी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघच ही मालिका जिंकू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फक्त बरोबरीचीच संधी आहे.
शेवटच्या षटकात मार्कोची फटकेबाजी, पण...
पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ६ बाद २१९ धावा करत यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर २२० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात मार्को यान्सेन यानं दक्षिण आफ्रिकेकडून दुसरी फास्टर फिफ्टी मारली. त्याने सामन्यात थोडी रंगत निर्माण केली. पण शेवटी भारतीय संघानंच बाजी मारली. ११ धावांनी सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेक़डून मार्को यान्सेन याने १७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याच्याशिवाय क्लासेन याने २२ चेंडूत ४१ धावांची खेळी केली.
टीम इंडियाकडून शर्माजी अन् वर्माजीनं केली हवा
सलग तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन खातेही न उघडता तंबूत परतला. त्यानंतर बढती मिळालेल्या तिलक वर्मानं सलामीवीर अभिषेक शर्माच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचली. २५ चेंडूत ५० धावा करून अभिषेक शर्मा बाद झाला. केश महाराजनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. दुसऱ्या बाजूला तिलक वर्मा शेवटपर्यंत थांबला. ५६ चेंडूत त्याने केलेल्या नाबाद १०७ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २१९ धावा केल्या.
बॅटिंगमध्ये सूर्यासह हार्दिक पांड्याचा फ्लॉप शो
सूर्यकुमार यादव अवघ्या एका धावेची भर घालून तंबूत परतला. हार्दिक पांड्यानं १६ चेंडूत १८ धावा केल्या. रिंकू सिंहनं १३ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या रमनदीपनं षटकार मारून खाते उघडले . ६ चेंडूत १५ धावांवर असताना तो रनआउटच्या रुपात बाद झाला. अक्षर पटेलनं नाबाद १ धाव केली. दक्षिण आफ्रिकेकडून अँडिले सिमेनेल आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. मार्को यान्सेन याच्या खात्यात एक विकेट जमा झाली.
भारताकडून अर्शदीप ठरला सर्वात यशस्वी गोलंदाज