India vs South Africa 3rd T20I Live Marathi : भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा ट्वेंटी-२० सामना आज होत आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागेल. यासाठी भारतीय गोलंदाजांना आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा करावी लागणार आहे. ग्याबेखा येथे संघाने दुसरा ट्वेंटी-२० सामना गमावला आहे. जोहान्सबर्ग येथील मागील ९ ट्वेंटी-२० सामन्यांपैकी आफ्रिकेने ६ जिंकले आहेत. आजच्या सामन्यात मार्को यानसेन व गेराल्ड कोएत्झी हे वर्कलोड व्यवस्थापनासाठी आज खेळणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या संघात कोणताच बदल नाही केला.
भारतीय संघाने पुन्हा एकदा रवी बिश्नोईला बाकावर बसवल्याने माजी खेळाडू गौतम गंभीर संतापला. जागतिक ट्वेंटी-२० क्रमवारीत बिश्नोई नंबर वन गोलंदाज आहे. गौतम म्हणाला, टीम इंडियाने तिच प्लेइंग इलेव्हन कायम राखल्याचा मला आश्चर्य वाटतंय. रवी बिश्नोई संघात हवा होता. मधल्या षटकांमध्ये विकेट मिळवून देणारा तुमचा गोलंदाज कोण? जलदगती गोलंदाज नव्हे.
भारत - यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका - रिझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रित्झके, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फेरेरा, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाड विलियम्स, तब्रेझ शम्सी, नांद्रे बर्गर