India vs South Africa 3rd T20I Live Marathi : शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल यांनी आज टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या ट्वेंटी-२०त दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आजचा सामना भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी जिंकावा लागणार आहे. पण, तिसऱ्या षटकात ड्रामा पाहायला मिळाला.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या संघात कोणताच बदल नाही केला. फिरकीपटू रवी बिश्नोईला आजही संधी न मिळाल्याने माजी खेळाडू गौतम गंभीर पुन्हा नाराज झाला. मागील सामन्यात शून्यावर बाद झालेल्या सलामीवीर शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल यांच्यावर आज मोठ्या खेळीचे आव्हान होते. या दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पण, तिसऱ्या षटकात केशव महाराजने धक्का दिला आणि गिल १२ धावांवर पायचीत झाला. तिलक वर्माला घाई नडली अन् पहिल्याच चेंडूवर तो झेल देऊन परतला. महाराजची हॅटट्रीक हुकली, परंतु गिलने DRS घेतला असता तर तो नाबाद राहिला असता. चेंडू यष्टींवर आदळत नसल्याचे रिप्लेत दिसले. यशस्वीने गिलला DRS न घेण्याचा सल्ला दिला होता.
भारत - यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका - रिझा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रित्झके, एडन मार्करम, हेनरिच क्लासेन, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फेरेरा, अँडीले फेहलुकवायो, केशव महाराज, लिझाड विलियम्स, तब्रेझ शम्सी, नांद्रे बर्गर.
Web Title: India vs South Africa 3rd T20I Live Marathi : Shubman Gill's Wicket is Missing the Stumps, Two in two for Keshav Maharaj
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.