India Vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेची 'ही' विकेट पाहाल तर पोट धरून हसत सुटाल

बीसीसीआयला व्हिडीओ झाला वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:11 PM2019-10-22T12:11:45+5:302019-10-22T12:12:14+5:30

whatsapp join usJoin us
India Vs South Africa, 3rd Test: If you see South Africa's 'this' wicket, you will laugh | India Vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेची 'ही' विकेट पाहाल तर पोट धरून हसत सुटाल

India Vs South Africa, 3rd Test : दक्षिण आफ्रिकेची 'ही' विकेट पाहाल तर पोट धरून हसत सुटाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दक्षिण आफ्रिकेवर कसोटी मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पण या सामन्यात एक अशी गोष्ट घडली की, तुम्ही ती कदाचित पाहिली नसेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एक फलंदाज असा आऊट झाला की, ते पाहिल्यावर तुम्ही पोट धरून हसाल.


भारताचा फिरकीपटू शाहबाझ नदीमने आज दोन विकेट्स मिळवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी नदीमने जो अखेरचा बळी मिळवला, त्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. कारण अशी विकेट आतापर्यंत कुणीही पाहिली नसेल.

नदीमने सलग दोन चेंडूंमध्ये दोन बळी मिळवले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी नदीमने जे लुंगी एनगिडीला ज्यापद्धतीने बाद केले, ते पाहिल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. नदीमच्या चेंडूवर एनगिडीने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी चेंडू थेट नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या फलंदाजाच्या हॅल्मेटला लागला. हॅल्मेटला लागून चेंडू थेट नदीमच्या हातात विसावला आणि भारताने विजय साकारला.

भारताचा विजयोत्सव बघायला पाहा आला तरी कोण; बीसीसीआय केला फोटो पोस्ट
भारताने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या सामन्यातही दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला. भारताचा हा विजयोत्सव पाहायला एक खास व्यक्ती रांचीच्या स्डेडियममध्ये उपस्थित होती. या खास व्यक्तीची दखल बीसीसीआयनेही घेतली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर या व्यक्तीचा फोटोही पोस्ट केला आहे.

भारताने या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन वेळा दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. त्याचबरोबर आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची घटना तब्बल 84 वर्षांनी घडली आहे. यापूर्वी 1935 साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. त्यांनी तब्बल सलग तीन सामन्यांमध्ये फॉलोऑन देत सामना जिंकला होता.

या खास व्यक्तीची वाट सर्वच जण पाहत होते. कारण या व्यक्तीने हा विजयोत्सव पाहावा, अशी बऱ्याच जणांना आशा होती. ही व्यक्ती गेले तीन दिवस स्टेडियममध्ये फिरकलीही नव्हती. पण आज भारताच्या विजयाच्या दिनी मात्र ही व्यक्ती स्टेडियममध्ये उपस्थित होती. फक्त स्टेडियमपुरता मर्यादीत न राहता ही व्यक्ती भारताच्या ड्रेसिंग रुममध्येही आली आणि काही खेळाडूंशी बातचीतही केली.

आता ही व्यक्ती कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही व्यक्ती म्हणजे रांचीचा सुपूत्र आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा विजयोत्सव पाहण्यासाठी धोनी उपस्थित होता. सामना संपल्यावर त्याने काही खेळाडूंशी बातचीतही केली. बीसीसीआयने धोनी आणि भारताचा फिरकीपटू शाहबाझ नदीम यांचा एक फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा पाहा आला तरी कोण, अशी बीसीसीआयने या ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोला कॅप्शनही दिली आहे.

Web Title: India Vs South Africa, 3rd Test: If you see South Africa's 'this' wicket, you will laugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.