भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारताने जिंकला. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारताने हा भीमपराक्रम पहिल्यांदाच केल्याचे पाहायला मिळत असल्याचे वृत्त आहे.
भारताने या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन वेळा दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. त्याचबरोबर आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची घटना तब्बल 84 वर्षांनी घडली आहे. यापूर्वी 1935 साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. त्यांनी तब्बल सलग तीन सामन्यांमध्ये फॉलोऑन देत सामना जिंकला होता.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारताने जिंकला. भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे. या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक इतिहास रचला आहे.
आपल्याच मातीमध्ये भारताच्या कर्णधाराला विराटसारखी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने आपल्याच मैदानात तब्बल तीनवेळा प्रतिस्पर्ध्यांना व्हाइट वॉश देण्याची किमया साधली आहे. आतापर्यंत एकाही भारताच्या कर्णधाराला आपल्याच मैदानात तीन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन करता आलेले नाही. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिनने दोन वेळा दोन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन केले होते.
भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली.
दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात आफ्रिकेचे दोन फलंदाज अवघ्या 9 धावांत माघारी परतले होते.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात उमेश यादवनं अप्रतीम चेंडू टाकून आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर झुबायर हम्झा आणि टेंबा बवुमा यांनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे वाटले होते. पण, रवींद्र जडेजानं अर्धशतक झळकावणाऱ्या हम्झाला बाद केले. हम्झानं 79 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचून 62 धावा केल्या. पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर प्रथमच टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या शाहबाज नदीमनं भारताला यश मिळवून दिले. त्यानं बवूमाला बाद करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट पटकावली. बवूमानं 72 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 32 धावा केल्या होत्या. कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या हेन्रीक क्लासेनला रवींद्र जडेजानं त्रिफळाचीत केले.
Web Title: India Vs South Africa, 3rd Test: Indian team breaks 84-year record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.