भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे. एकिकडे भारताच्या विजयाची, तर दुसरीकडे रवी शास्त्रींच्या ड्रेसिंग रुममधील डुलकीची चर्चा सुरू आहे. यापूर्वी शास्त्री बऱ्याचदा ट्रोल झालेले आहेत. भारतीय संघ मैदानात दमदार कामगिरी करत असताना शास्त्री मात्र चक्क झोपल्याचे पाहायला मिळाले. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला असून आता चाहत्यांनी शास्त्री यांना ट्रोल केले आहे. पण, शास्त्रींनीही टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.
शास्त्रींवर या टीकेचा फार परिणाम झाला असा जाणवत नाही. ते म्हणाले,''मी हे सर्व एन्जॉय करतो... लोकं काय म्हणतात याची मी पर्वा करत नाही.''
तिसऱ्या कसोटीनंतर रवी शास्त्री यांचं वादग्रस्त विधान, व्हायरल व्हिडीओवर संताप
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना भारताने एक डाव व 202 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारताने हा भीमपराक्रम पहिल्यांदाच केल्याचे पाहायला मिळत असल्याचे वृत्त आहे. भारताने या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन वेळा दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची घटना तब्बल 84 वर्षांनी घडली आहे. यापूर्वी 1935 साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. या सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानाचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: India vs South Africa, 3rd Test : Ravi Shastri says "I don't care" after being roasted for sleeping on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.