भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मानं खणखणीत शतक झळकावलं. त्यानं दमदार षटकार खेचून कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक पूर्ण केले. त्यानं या कामगिरीसह एक वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्यानंतर भारताच्या एकाही सलामीवीराला जी कामगिरी करता आली नव्हती, ती रोहितनं आज केली.
भारताचे तीन फलंदाज अवघ्या 71 धावांत माघारी पाठवले. पण, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं ही पडझड थांबवली. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. रोहितनं अर्धशतक झळकावून एका विक्रमाला गवसणी घातली होती. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक तीन वेळा 50+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत त्यानं गौतम गंभीर ( 2010) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 1996) यांच्याशी बरोबरी केली.
त्यानंतर त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपांतर करताना कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यांच्यानंतर हा मान रोहितनं पटकावला. शिवाय नोव्हेंबर 2015नंतर घरच्या मैदानावर एकाच मालिकेत तीन शतक करणारा तो जगातला पहिला सलामीवीर ठऱला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने न्यूझीलंडविरुद्घ ही कामगिरी केली होती. एका मालिकेत सर्वाधिक शतक झळकावणारे भारतीय सलामीवीर4 - सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज 1970-714 - सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज 1978-793- सुनील गावस्कर वि. ऑस्ट्रेलिया 1977-783 - रोहित शर्मा वि. दक्षिण आफ्रिका 2019-20