भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने दमदार कामगिरी केली आहे. तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावत रोहितने संधीचे सोने केल्याचे म्हटले जात आहे. पण रोहितच्या या कामगिरीमुळे त्याच्या दोन मित्रांची कारकिर्द धोक्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
रोहितने पहिल्या कसोटी सामन्यात दोन शतके लगावली होती. आता तिसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद शतत झळकावले आहे. आता या सामन्यात तो द्विशतक झळकावतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. पण या त्रिशतकांमुळे रोहितच्या दोन मित्रांची कारकिर्द धोक्यात आली आहे. या दोन मित्रांची नावे आहेत लोकेश राहुल आणि शिखर धवन. सध्याच्या घडीला हे दोघेही संघाबाहेर आहेत. रोहितने संघात आल्यावर धडाकेबाज कामगिरी केली आहे, त्यामुळे आता संघातील त्याचे स्थान निश्चित समजले जात आहे. दुसरीकडे सलामीवीर मयांक अगरवालही चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे आता हे दोघेच पुढील कसोटी मालिकेत सलामीला येतील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारताच्या कसोटी संघातील राहुल आणि धवन यांचा पत्ता कट झाल्याचे म्हटले जात आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहितनं शतक झळकावून अनेक विक्रम मोडले. पण, त्यानं एका विश्विविक्रमालाही गवसणी घातली.
रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. त्यानं या कामगिरीसह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने 1998 च्या कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती. त्यानंतर ग्रॅमी स्मिथ ( 2005) आणि डेव्हिड वॉर्नर ( 2016) यांनी कॅलेंडर वर्षात नऊ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहे. तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला.
या सह त्यानं वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद केली. त्यानं एका कसोटी मालिकेत सर्वात जास्त षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरनं 2018 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 15 षटकार खेचले होते. रोहितनं या मालिकेत आतापर्यंत 17 षटकार खेचले आहेत. या विक्रमात अव्वल पाचमध्ये वसमी राजा ( 14 वि. वेस्ट इंडिज 1977), अँण्ड्य्रु फ्लिंटॉफ ( 14 वि. दक्षिण आफ्रिका 2003) आणि मॅथ्यू हेडन ( 14 वि. झिम्बाब्वे 2003) यांचा समावेश आहे. भारताकडून एका मालिकेत सर्वाधित षटकारांचा विक्रम हरभजन सिंगच्या नावावर होता. त्यानं 2010मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 14 षटकार खेचले होते.