भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवसही रोहित शर्माच्या नावावर राहिला. अजिंक्य रहाणे शतकी खेळीनंतर माघारी परतल्यानंतर रोहितनं सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्यानं दमदार फटकेबाजी करताना कसोटी क्रिकेटमधील पहिले वैयक्तिक द्विशतक झळकावले. उपाहारापूर्वी 199 धावांवर असणारा रोहित मैदानावर परतला तेव्हा पहिल्या षटकात त्याला धाव घेता आली नाही. त्यामुळे पहिल्या द्विशतकाची उत्सुकता अधिक ताणली गेली होती, परंतु त्यानं ती विक्रमी धाव षटकार मारून घेत जल्लोष साजरा केला. संघ सहकाऱ्यांनीही त्याच्या खेळीचं मनापासून कौतुक केलं.
3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. अजिंक्यनं 192 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार लगावत 115 धावा केल्या. या जोडीनं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोडीत तिसरे स्थान पटकावले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे.
त्यानंतर रोहितनं 150 धावांचा पल्ला ओलांडला. या कामगिरीसह रोहितनं कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावाची नोंद केली. त्यानं या कसोटीत 500+ धावा करण्याचा विक्रमही केला. एका कसोटी मालिकेत 500+ धावा करणारा तो पाचवा भारतीय सलामीवीर ठरला, परंतु वीरेंद्र सेहवाग आणि रोहित यांच्या खेळीत साम्य राहिले. रोहितनं मालिकेत 500+ धावा करण्याचा विक्रम केला. एकाच कसोटी मालिकेत 500+ धावा करणारा रोहित भारताचा पाचवा सलामीवीर ठरला. यापूर्वी विनू मांकड, बुधी कुंदरन, सुनील गावस्कर ( 5), वीरेंद्र सेहवाग यांनी अशी कामगिरी केली आहे. पण, सेहवागनंतर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 500+ धावा करणारा रोहित हा पहिलाच सलामीवीर ठरला. रोहितनं षटकार खेचून द्विशतक पूर्ण केलं. त्यानं 249 चेंडूंत 28 चौकार व 5 षटकार खेचून ही खेळी केली.