भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत शाहबाज नदीमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांची येथे होणाऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नदीमनं एक विकेट घेतली. पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर नदीमला अखेर पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी खेळण्याची संधी मिळाली. . नदीमनं आफ्रिकेच्या टेंबा बवूमाला बाद करून पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली. उपाहारापर्यंत आफ्रिकेच्या 6 बाद 129 धावा झाल्या होत्या. नदीमचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असला तरी सध्याच्या संघातील तो सर्वात सीनियर खेळाडू आहे. अशी आकडेवारीच आमच्याकडे आहे.. चला जाणून घेऊया...
कुलदीप यादवच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे नदीमला संघात स्थान मिळाले. भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा तो 296 वा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर त्याला पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. 2004मध्ये झारखंड संघाकडून नदीमन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही त्यावेळी झारखंड संघाकडून खेळायचा. पण, 15 वर्षांनंतर नदीमला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्यानं भारत A संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 110 सामन्यांत 28.59च्या सरासरीनं 424 विकेट्स घेतल्या आहेत. रणजीच्या 2015 ते 2017 पर्यंतच्या सत्रात त्यानं 107 विकेट्स घेत टीम इंडियाचे दार ठोठावले होते. पण, त्याला संधी मिळाली नाही.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना 64 सामन्यांत 42 विकेट्स घेतल्या आहेत. 2018च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. नदीमनं 2004मध्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सध्या टीम इंडियातील अंतिम अकरामध्ये खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये नदीम हा सर्वात सीनियर सदस्य आहे.
टीम इंडियाच्या XI चे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पण कधीशाहबाज नदीम - 2004चेतेश्वर पुजारा - 2005आर अश्विन - 2006विराट कोहली - 2006 रवींद्र जडेजा - 2006रोहित शर्मा - 2006अजिंक्य रहाणे - 2007वृद्धीमान साहा - 2007उमेश यादव - 2008मोहम्मद शमी - 2010 मयांक अग्रवाल - 2013