भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : संघातील बारावा खेळाडू हा राखीव असतो. पण आता हा दक्षिण आफ्रिकेचा बारावा खेळाडू फलंदाजीसाठी उतरणा आहे. आता हा बारावा खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा डावाने होणारा पराभव टाळणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
आयसीसीचे नियम आता बदलण्यात आले आहेत. जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याजागी राखीव असलेला बारावा खेळाडू खेळू शकतो. त्यानुसार आता दक्षिण आफ्रिकेचा बारावा खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज झाला आहे.
तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गर हा दुखापतग्रस्त झाला आहे. उमेश यादवचा एक उसळता चेंडू एल्गरला लागला आणि तो थेट जमिनीवर पडला. त्यानंतर एल्गरची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असून तो हा सामना खेळू शकणार नाही, असे वृत्त आहे. त्यामुळे आता जर एल्गर खेळू शकत नसेल तर त्याच्याजागी बाराव्या खेळाडूला फलंदाजीसाठी पाठवण्यात येणार आहे.
उमेश यादवचा बाऊन्सर आदळला आणि तो थेट जमिनीवरच पडलारांची येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचा एक बाऊन्सर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर आदळला आणि त्यानंतर तो थेट जमिनीवर पडल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाला गंभीर दुखापत झाली असून त्याला आता या सामन्याला मुकावे लागणार आहे.
उमेश यादवच्या दहाव्या षटकात ही गोष्ट घडली. उमेशने एक बाऊन्सर टाकला. या बाऊन्सरचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरला यशस्वीपणे करता आला नाही. हा चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला आणि तो थेट जमिनीवर पडला. एल्गर जमिनीवर पडल्यावर भारताचे खेळाडू त्याच्याजवळ धावत गेले. संघाचा फिजिओही मैदानात आला. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती की, त्यानंतर एल्गरला एकही चेंडू खेळता आला नाही.
एल्गरने तीन चौकारांच्या मदतीने नाबाद 16 धावा केल्या होत्या. पण आता दुखापतीमुळे त्याला पुन्हा मैदानात येता येणार नाही. आता त्याच्याजागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी देण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली.