भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर गोलंदाज उमेश यादवनं क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले. त्यानं फलंदाजीत कमाल दाखवताना ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या कर्णधार विराट कोहलीलाही थक्क केले. त्याची फटकेबाज पाहून सहकारी अवाक् झाले आणि चाहत्यांनीही मनमुराद आस्वाद लुटला. उमेशनं 10 चेंडूंत 5 षटकार खेचून 31 धावा चोपल्या. त्यानं 310 च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 10+ चेंडूंचा सामना करून सर्वोत्तम स्ट्राईक रेट राखण्याचा पराक्रम उमेशनं केला. शिवाय त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs South Africa, 3rd Test : उमेश यादवची षटकारांची आतषबाजी; सचिन तेंडुलकरशी बरोबरी
India vs South Africa, 3rd Test : उमेश यादवची षटकारांची आतषबाजी; सचिन तेंडुलकरशी बरोबरी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांच्यानंतर गोलंदाज उमेश यादवनं क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 2:40 PM