भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरा गेला. यावेळी एका पत्रकाराने त्याला महेंद्रसिंग धोनीबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला कोहलीने जे उत्तर दिले ते ऐकाल तर हैराण व्हाल...
हा सामना धोनीच्या घरच्या मैदानात म्हणजेच रांचीमध्ये होता. या सामन्याच्या तीन दिवसांमध्ये धोनी एकदाही स्टेडियममध्ये फिरकला नाही. त्यामुळे एका पत्रकाराने कोहलीला धोनीबाबत प्रश्न विचारला.
एका पत्रकाराने विचारले की, " हा सामना धोनीच्या घरच्या मैदानात म्हणजेच रांचीला आहे. पण धोनी मात्र सामना पाहण्यासाठी आला नाही?" यावर कोहली म्हणाला की, " धोनी सामना पाहायला आला नाही, असं तुम्हाला कोणी सांगितलं. धोनी आता ड्रेसिंग रुममध्ये आहे आणि खेळाडूंची बातचीत करत आहे. तुम्ही जाऊन त्याची विचारपूसही करू शकता."
जे कोणालाच जमलं नाही, ते भारतीय संघाने करून दाखवलंभारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सहजपणे खिशात टाकली. या विजयासह भारताने अशी एक गोष्ट साध्य केली आहे की जी क्रिकेट विश्वामध्ये कोणत्याही संघाला अजूनपर्यंत करता आली नाही. रांचीतील विजयासह भारताने हा इतिहास रचल्याचे म्हटले जात आहे.
भारताने यापूर्वी वेस्ट इंडिजवर मालिका विजय मिळवला होता. आता घरच्या मैदानात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. अव्वल स्थानासह भारताच्या खात्यामध्ये पाच सामन्यातील पाच विजयांसह तब्बल 240 गुण जमा झाले आहेत, अशी कामगिरी करणार भारत पहिला संघ ठरला आहे. कारण आतापर्यंत एकाही संघाला आपल्या गुणांचे शतकही पूर्ण करता आलेले नाही. भारतानंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या नावावर 60 गुण जमा आहेत.
दक्षिण आफ्रिकेची 'ही' विकेट पाहाल तर पोट धरून हसत सुटालभारताने दक्षिण आफ्रिकेवर कसोटी मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पण या सामन्यात एक अशी गोष्ट घडली की, तुम्ही ती कदाचित पाहिली नसेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एक फलंदाज असा आऊट झाला की, ते पाहिल्यावर तुम्ही पोट धरून हसाल.
भारताचा फिरकीपटू शाहबाझ नदीमने आज दोन विकेट्स मिळवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी नदीमने जो अखेरचा बळी मिळवला, त्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. कारण अशी विकेट आतापर्यंत कुणीही पाहिली नसेल.
नदीमने सलग दोन चेंडूंमध्ये दोन बळी मिळवले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी नदीमने जे लुंगी एनगिडीला ज्यापद्धतीने बाद केले, ते पाहिल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. नदीमच्या चेंडूवर एनगिडीने जोरदार फटका लगावण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी चेंडू थेट नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या फलंदाजाच्या हॅल्मेटला लागला. हॅल्मेटला लागून चेंडू थेट नदीमच्या हातात विसावला आणि भारताने विजय साकारला.