नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-20 मालिकेसाठी आज बीसीसीआयनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची निवड केली आहे. या संघात टी-20 स्पेशालिस्ट सुरेश रैनानं पुनरागमन केलं आहे. तर अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आलं आहे. मुंबईकर शार्दुल ठाकूर आणि जयदेव उडाटकटलाही 16 णांमध्ये संधी देण्यात आली आहे. धोनीच्या साथीला अतिरिक्त विकेटकिपर म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेल्या संघात तीन सलामिवीर, दोन वकेटकिपर, दोन अष्टपैलू, दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीतील जबाबदारी विराट, रैना आणि मनिष पांड्याच्या खांद्यावर असणार आहे.
असा आहे भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, एम.एस. धोनी(WK), दिनेश कार्तित (WK), हार्दिक पांड्या, मनिष पांडे, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदिप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, जयदेव उनाडकट आणि शार्दुल ठाकूर