चंदिगड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी चंदिगड येथे होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी खेळाडूंना सुरक्षा पुरवण्यात चंदिगड पोलिसांनी नकार दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) खेळाडूंच्या सुरक्षेसाठी देण्यात येणारी 9 कोटी रक्कम अद्याप खात्यात जमा न केल्यामुळे पोलिसांनी हा पवित्रा घेतली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ मोहाली विमानतळावर दाखल होताच मोहाली पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली. पण, चंदिगड पोलिसांची हद्द सुरू होताच ते माघारी फिरले. पण, बीसीसीआयनं सुरक्षा पुरवण्यासाठीची रक्कमच जमा न केल्यानं चंदिगड पोलिसांनी संघांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिला. दरम्यान खाजगी सुरक्षकांच्या देखरेखीखाली संघ हॉटेलमध्ये सुरक्षित पोहोचले आहेत.
पावसामुळे पहिला ट्वेन्टी-20 सामना रद्दभारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याला आज (रविवार) पासून सुरुवात होत आहे. धर्मशाला येथे पहिला ट्वेंटी-20सामना खेळवण्यात येणार असून वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. तसेच आज देखील पावसाची शक्याता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
भारताचा ट्वेंटी-20 संघ ः विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिकेचा ट्वेंटी-20 संघ : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.