India vs South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्रकार परिषद गाजली. विराटच्या विधानांवर आता BCCIकडून काय उत्तर मिळते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाली आणि बीसीसीआयनं खेळाडूंचे फोटो पोस्ट केले. पण, त्यात विराटचा फोटो नसल्यानं पुन्हा एक नवा वाद सुरू होण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, आफ्रिका दौऱ्यावर विराट त्याच्या कुटुंबीयांसोबत निघाला आहे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराट व अनुष्का शर्मा यांची कन्या वामिका ११ जानेवारीला एक वर्षाची होणार आहे. त्याकालावधीत विराट आफ्रिका दौऱ्यावरच असणार आहे. मुलीच्या वाढदिवसासाठी विराट वन डे मालिकेतून माघार घेण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, विराटनं त्या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. विराट कुटुंबीयांसोबतच आफ्रिका दौऱ्यावर जात असल्यानं वामिकाचा वाढदिवस तो तिथेच साजरा करणार आहे. वामिकाच्या पहिल्या वाढदिवसाला विराट १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. त्यामुळे हे दोन्ही योगायोग विराट दणक्यात साजरे करेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहचलेल्या विराटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो फोटोग्राफर्सना कृपया वामिकाचे फोटो काढू नका अशी विनंती करतोय. विराट व अनुष्का मुलीप्रती किती भावनिक आहेत, याची प्रचिती अनेकदा आली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर वामिकाला प्रसिद्धीपासून दूर ठेवा, वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका, असे आवाहन केले होते.
पाहा व्हिडीओ..
ट्वेटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर एका अभियांत्रिकानं विराट-अनुष्का यांच्या कन्येप्रती आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्या तरुणाला अटक केली गेली. पण, या घटनेनं विराट व अनुष्का यांना मानसिक त्रास झाला होता.
Web Title: India vs South Africa: Don't take photos of my daughter, please; Virat Kohli depart South Africa with wife Anushka and Daughter Vamika video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.