Deepak Chahar Crying : दीपक चहरनं विजयासाठी सर्व प्रयत्न केले, पण भारताच्या पराभवानंतर त्याला अश्रू अनावर झाले, Photo Viral 

Deepak Chahar Crying, India vs South Africa ODI series : श्रीलंका दौऱ्यानंतर थेट दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या वन डे सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या दीपक चहरनं भारताला जवळपास विजय मिळवून दिलाच होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 10:12 AM2022-01-24T10:12:39+5:302022-01-24T10:13:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa : Heart goes out to Deepak Chahar, He was crying after the India loss to South Africa by 4 runs, See pic  | Deepak Chahar Crying : दीपक चहरनं विजयासाठी सर्व प्रयत्न केले, पण भारताच्या पराभवानंतर त्याला अश्रू अनावर झाले, Photo Viral 

Deepak Chahar Crying : दीपक चहरनं विजयासाठी सर्व प्रयत्न केले, पण भारताच्या पराभवानंतर त्याला अश्रू अनावर झाले, Photo Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Deepak Chahar Crying, India vs South Africa ODI series : श्रीलंका दौऱ्यानंतर थेट दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या वन डे सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या दीपक चहरनं भारताला जवळपास विजय मिळवून दिलाच होता. संघाला विजयासाठईी १० धावांची गरज असताना चहर बाद झाला अन् उर्वरित दोन फलंदाजांना १७ चेंडूंत त्या करता आल्या नाही. आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर दीपकनं दमदार फलंदाजी करताना संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले होते. पण, ४ धावांनी हार मानावी लागल्यानंतर दीपकला अश्रू अनावर झाले. त्याचे डोळे पाणावलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं क्विंटन डी कॉकच्या ( १२४) शतकी, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेनच्या ( ५२) अर्धशतकी  आणि डेव्हिड मिलर ( ३९) व ड्वेन प्रेटोरीयस ( २०) यांच्या योगदानाच्या जोरावर २८७ धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक ३, दीपक चहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 
धावांचा पाठलाग करताना भारताला २८३ धावांपर्यंतच मजल मारता आली. मधल्या फळीनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. शिखर धवन ( ६१) व विराट कोहली ( ६५) खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीय संघ जिंकेल असे वाटत होते. श्रेयस अय्यर ( २६) व सूर्यकुमार यादव ( ३९) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. दीपक चहरनं ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीनं ५४ धावा करताना भारताला विजयी मार्गावर आणले होते, परंतु अवघ्या ४ धावांनी आफ्रिकेनं बाजी मारली. 


राहुल द्रविडनंही दीपकचे कौतुक केले. त्याच्याकडे फलंदाजी करण्याची क्षमता आहे. भारत अ संघाकडून त्याला असं खेळताना मी पाहिलं आहे आणि मला माहित्येय तो फलंदाजी करू शकतो. त्यानं आम्हाला चांगला पर्याय दिला आहे,  असे द्रविड म्हणाला.   


Web Title: India vs South Africa : Heart goes out to Deepak Chahar, He was crying after the India loss to South Africa by 4 runs, See pic 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.