Join us  

India vs South Africa : टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या घोषणेचा दिवस ठरला, लोकेश राहुलला मिळणार डच्चू? 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 4:28 PM

Open in App

धर्मशाला, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. उभय देशांमध्ये कसोटीत मात्र आफ्रिकेने 36पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर केवळ 11 मध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे.   या दौऱ्यासाठी टीम इंडियाने ट्वेंटी-20 संघ जाहीर केला आहे. विंडीजपाठोपाठ निवड समितीनं आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिषभ पंतच यष्टीमागे दिसणार आहे. पण, कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार गुरुवारी आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी  मालिकेसाठीचा भारतीय संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. या मालिकेतून सलामीवीर लोकेश राहुलला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. राहुलला सातत्याने अपयशी ठरला आहे आणि विंडीज दौऱ्यात त्यानं 4 डावांत 101 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या जागी आता रोहित शर्माचा सलामीला विचार होऊ शकतो, असे सूचक विधान निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिले आहेत. 

India vs South Africa Schedule : आफ्रिकेचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

खूशखबर : रोहित शर्मा कसोटीतही ओपनिंग करणार, निवड समिती प्रमुखांचे सूचक विधान

शिवाय हार्दिक पांड्याचे कसोटी संघात कमबॅक होऊ शकते. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिक विश्रांतीवर आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून तो टीम इंडियात पुनरागमन करणार. त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीही हार्दिकचा विचार होऊ शकतो. अजिंक्य रहाणेला गवसलेला सूर ही संघासाठी फार मोठी गोष्ट आहे. शिवाय हनुमा विहारीच्या रुपानं मधल्या फळीत सक्षम पर्याय संघाला मिळाला आहे. 

कसा असेल भारतीय संघ? - मयांक आग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार), हनुमा विहारी, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह कसोटी मालिकेचे वेळापत्रकपहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनदुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनतिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलरोहित शर्माविराट कोहलीअजिंक्य रहाणे