India vs South Africa: कसोटी मालिकेत असेल भारतावर दडपण

भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे; शिवाय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे काही प्रमाणात दडपण नक्कीच असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:00 AM2019-09-26T02:00:20+5:302019-09-26T06:58:35+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa: India will be pressured into Test series | India vs South Africa: कसोटी मालिकेत असेल भारतावर दडपण

India vs South Africa: कसोटी मालिकेत असेल भारतावर दडपण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमत

दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारत दौऱ्यावर आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ तुलनेत कमजोर आहे. हाशिम आमला, एबी डिव्हिलियर्स आणि डेल स्टेन या स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत त्यांचा संघ फारसा बलाढ्य दिसत नाही. हे तिन्ही खेळाडू गेल्या १०-१२ वर्षांपासून दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे आधारस्तंभ राहिले आहेत. शिवाय टी२० मालिकेत फाफ डूप्लेसिस खेळला नव्हता; पण कसोटीत मात्र तो संघाचे नेतृत्व करेल. असे असले तरी दक्षिण आफ्रिकेने टी२० मालिकेत भारताला बरोबरीत रोखले. त्यामुळेच गेल्या भारत दौऱ्यात कसोटी मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा वळण घेणाºया खेळपट्टीवर दारुण पराभव झाला होता. त्यामुळेच भारताचे पारडे नक्कीच वरचढ आहे.

भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत आहे; शिवाय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे काही प्रमाणात दडपण नक्कीच असेल. त्याउलट दक्षिण आफ्रिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही. ते येथे कमावण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आफ्रिकन खेळाडू मोकळेपणे खेळतील. भारताला मात्र विचारपूर्वक खेळावे लागेल. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डीकॉक सध्या जबरदस्त खेळाडू ठरत आहे. तो मर्यादित षटकांच्या सामन्यांसह कसोटीतही चांगला खेळतो.

कसोटी मालिकेविषयी सांगायचे झाल्यास ही मालिका जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने दोन्ही संघ दोन्ही सामने जिंकण्याचा प्रयत्न करतील. कारण दोन वर्षांनी होणारी अंतिम फेरी खेळण्यासाठी प्रत्येक संघ जास्तीतजास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. भारताने आधीच दोन सामने जिंकून चांगली तयारी केली आहे; पण आफ्रिकेची आता सुरुवात होईल. जर भारताने या मालिकेतही दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे गुणतालिकेतील अव्वल स्थान आणखी भक्कम होईल. पण यासाठी भारतीयांना काही गोष्टींवर गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.

रोहित शर्मावर विशेष लक्ष असेल. त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन होत असून तो पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून खेळेल. त्याच्यासारखा गुणवान खेळाडू खूप कमी वेळा लाभतो. कसोटी क्रिकेटमध्ये दुर्दैवाने त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांइतके यश मिळवता आले नाही. त्यामुळे स्वत:ची जागा निर्माण करण्यात तोही उत्सुक आहे. जर ही संधी त्याने साधली, तर रोहितसाठी ही नक्कीच नवी सुरुवात ठरेल.

Web Title: India vs South Africa: India will be pressured into Test series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.