धर्मशाला, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये तीन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहे. हे तीन खेळाडू कोण, ते जाणून घ्या...
रिषभ पंत : आतापर्यंत भारतीय संघात सर्वात जास्त संधी देण्यात आली आहे ती रिषभ पंतला. पण पंताला या संधीचे सोने करता आलेले नाही. कारण १८ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याला ३०२ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत पंत कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
नवदीप सैनी : भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण केले. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये त्याने पाच बळी मिळवले आहेत. त्यामुळे या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते, यावर सर्वांच्या नजरा असतील.
कृणाल पंड्या : आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कृणालने बऱ्याच जणांची मने जिंकली आहेत. या मालिकेत त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.
वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. उभय देशांमध्ये कसोटीत मात्र आफ्रिकेने 36पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर केवळ 11 मध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे.