India vs South Africa : अजिंक्य रहाणेच्या जागेवर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयनं कसोटी संघाचा उप कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली. पण, दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सराव सत्रात रोहितला दुखापत झाली आणि त्याला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. BCCIनं रोहितच्या माघारीचे वृत्त देताना कसोटी संघाच्या उप कर्णधारपदाची जागा रिक्त ठेवली होती. पण, आज बीसीसीआयनं त्याची घोषणा केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २९ वर्षांचा कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे आणि त्याच्यासोबत उप कर्णधार म्हणून लोकेश राहुल ( KL Rahul) याचे नाव BCCIनं आज जाहीर केलं. ( KL Rahul named vice-captain of Test team for South Africa series)
तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३९ कसोटी सामने झाले आणि त्यात आफ्रिकेनं १५, तर भारतानं १४ विजय मिळवले. १० सामने ड्रॉ राहिले. त्यामुळे भारतीय संघ या दौऱ्यावर या आकडेवारीत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. भारताच्या तुलनेत आफ्रिकेचा संघ कागदावर कमकुवत दिसत आहे आणि अशात भारताला आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची आयती संधी आहे. पण, रोहितच्या माघारीमुळे संघाला किंचित फटका बसू शकतो.
रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळची निवड
पियांक पांचाळकडे १०० प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. तो सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि तेथे त्यानं ९६, २४ व ० अशी तीन डावांत खेळी केली आहे. रणजी करंडक २०१६-१७च्या पर्वात पांचाळनं १७ डावांत ८७.३३च्या सरासरीनं १३१० धावा केल्या होत्या. त्याच पर्वात त्यानं पंजाबविरुद्ध नाबाद ३१४ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती. गुजरातनं तेव्हा जेतेपदही जिंकले होते.
भारतीय संघ -विराट कोहली ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज ( India’s Test squad: Virat Kohli (Captain), KL Rahul (vice-captain), Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Ajinkya Rahane, Priyank Panchal, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Rishabh Pant (wicket-keeper), Wriddhiman Saha (wicket-keeper), R Ashwin, Jayant Yadav, Ishant Sharma, Mohd. Shami, Umesh Yadav, Jasprit Bumrah, Shardul Thakur, Md. Siraj)
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
- पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
- दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
- तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन
Web Title: India vs South Africa : KL Rahul named vice-captain of Test team for South Africa series, replaces Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.