Join us  

कधी अन् कुठं पाहता येईल IND vs SA यांच्यातील Live सामना? तेही अगदी फुकटात! वाचा सविस्तर

IND vs SA यांच्यातील टी-२० मालिकेतील सामने कधी अन् कुठे रंगणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 7:09 PM

Open in App

IND vs SA Live: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ८ नोव्हेंबरला डरबनच्या मैदानातून या नव्या मोहिमेची सुरुवात करेल. या मालिकेत सर्व सामने ४ वेगवेगळ्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. डरबनमधील पहिल्या लढतीनंतर गेकेबरा, सेंच्युरीयन आणि जोहान्सबर्गच्या मैदानात १०, १३ आणि १५ नोव्हेंबरला या लढती नियोजित आहेत. एक नजर टाकुयात टी-२० मालिकेतील सामने कधी अन् कुठे रंगणार? क्रिकेट चाहत्यांनना लाइव्ह सामन्याचा आनंद कसा घेता येईल? यासंदर्भातील सविस्तर माहिती

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना कधी अन् कुठं खेळवण्यात येणार?

India vs South Africa यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिली लढत शुक्रवारी, ८ नोव्हेंबरला रंगणार आहे. हा सामना डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहिला सामना हा रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. लढतीला सुरुवात होण्याआधी अर्धातास अगोदार दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

क्रिकेट चाहत्यांना कसा घेता येईल IND vs SA Live सामन्याचा आनंद? 

भारतीय चाहत्यांना स्पोर्ट्स १८ या चॅनेलवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढत लाइव्ह पाहता येईल. याशिवाय मोबाईलच्या माध्यमातून जिओ सिनेमावर या सामन्याच्या लाइव्ह स्ट्रिमिंगचा आनंद क्रिकेट चाहत्यांना अगदी फुकटात घेता येणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक (India vs South Africa T20I Schedule)

  • ८ नोव्हेंबर: पहिला टी२० सामना, डरबन (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होईल सामना)
  • १० नोव्हेंबर: दुसरा टी२० सामना,  गेकेबेरा (भारतीय प्रमाणवेळनुसार रात्री ७:३० वाजता सुरु होईल सामना)
  • १३ नोव्हेंबर: तिसरा टी२० सामना, सेंच्युरीयन  (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होईल सामना)
  • १५ नोव्हेंबर: चौथा टी २० सामना, जोहान्सबर्ग (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होईल सामना)

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशक , आवेश खान, यश दयाल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जानेसन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रूगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिले सिमलेन, लूथो सिपाम्ला (तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० साठी, ट्रिस्टन स्टब्स.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार अशोक यादवद. आफ्रिका