पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीवर नाराजी व्यक्त केली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या वन डे मालिकेतील दोन सामने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मालिकेतील दोन सामने अनुक्रमे लखनौ आणि कोलकाता येथे होणार होते. पण, हा निर्णय घेताना गांगुलीनं पश्चिम बंगाल सरकारला कळवले नसल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. या मालिकेतील दूसरा सामना 15 मार्चला लखनऊ आणि तिसरा वन डे सामना 18 मार्चला कोलकाता येथे रंगणार होता. तसेच हे दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णयही बीसीसीआयने घेतला होता. मात्र कोरोना व्हायरसचा प्रदूर्भाव पाहता मालिकेतील दोन्ही सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे.
त्यामुळे बॅनर्जी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीवर भडकल्या आणि त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ''गांगुलीसोबत कोणताही वाद नाही, सर्वकाही ठिक आहे. पण, कोलकाता येथील सामना रद्द केल्याचं त्यानं सांगायला हवं होतं, बाकी काही नाही. सामना कोलकाता येथे होणार होता, तर किमात कोलकाता पोलिसांना तो रद्द झाल्याची माहिती द्यायला हवी होती. राज्याचे मुख्य सचिव किंवा गृहसचिव किंवा पोलीस आयुक्त यांना त्याची कल्पना का दिली गेली नाही?, निर्णय घेऊन तुम्ही आम्हाला कसं कळवता?,''असे बॅनर्जी म्हणाल्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus मुळे आता 'मिनी आयपीएल'चा प्रस्ताव; वर्ल्ड कपचा फॉरमॅट कॉपी करणार?
Coronavirus: रायगड, पनवेलमधील खेळाडू शारजाहून परतले; 14 दिवसांसाठी निरिक्षणाखाली
वटवाघूळ खाण्याची, त्यांचं रक्त व लघवी पिण्याची गरजच काय?; Corona Virusवरून पाक गोलंदाज भडकला
IPL 2020 : आयपीएल होणार की नाही? BCCIच्या बैठकीत सात पर्यायांवर झाली चर्चा
IPL 2020 : प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यात मजा नाही; वीरेंद्र सेहवागची स्पष्ट भूमिका