भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला. हा सामना दुपारी १.३० सुरू होणार होता, पण पावसानं अजूनही विश्रांती घेतलेली नाही. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाला आणि त्यामुळे नाणेफेकही झालेली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्यानं अखेरीस साडेपाचच्या सुमारास हा सामना रद्द झाल्याची घोषणा बीसीसीआयनं केली.
तीन वन डे सानम्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १५ मार्चला लखनऊ येथे होईल, त्यानंतर १८ मार्चला कोलकाता येथे अखेरचा सामना होणार आहे. या दोन सामन्यांबद्दल मोठा निर्णय घेतला गेला आहे. हे दोन्ही सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे बंद दरजवाजात हे सामने होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक
Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका
मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!
OMG : आंतरराष्ट्रीय खेळाडूला Corona Virusची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द
BCCI ची कोंडी; IPL 2020 चा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन