मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे माघार घेतली आहे आणि त्याच्या जागी उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेत रोहित शर्माला कसोटीत प्रथच सलामीला खेळण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी अध्यक्षीय एकादश संघासोबत दक्षिण आफ्रिकेचा संघ सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यात रोहित शर्मा अध्यक्षीय एकादश संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
ICC World Test Championship : भारत-दक्षिण आफ्रिका आता कसोटीत भिडणार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारत आणि आफ्रिका यांच्यात तीन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. तत्पूर्वी 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत विशाखापट्टणम येथे सराव सामना होणार आहे. या सामन्यात रोहितकडे नेतृत्व असणार आहे, शिवाय त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताच्या कसोटी संघातून खराब फॉर्माशी झगडत असलेल्या लोकेश राहुलला डच्चू देत निवड समितीनं युवा फलंदाज शुबमन गिलला संधी दिली. राहुलच्या अनुपस्थितीत हिटमॅन रोहित शर्मा कसोटीत प्रथमच सलामीला मैदानावर उतरणार आहे.
अध्यक्षीय एकादश संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, एआर इस्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, केएस भरत( यष्टिरक्षक), जलज सक्सेना, डी जडेजा, आवेश खान, इशान पोरेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव.
भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.
कसोटी मालिकेचे वेळापत्रकपहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनदुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनतिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून