Join us  

India Vs South Africa : रोहित शर्माच्या वक्तव्याने रीषभ पंतचे करीअर धोक्यात?

रोहितने रिषभ पंतच्या करीअरचे काय होऊ शकते, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 5:50 PM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या रोहित शर्माने पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला आला आणि त्यने दोन्ही डावांमध्ये शतके झळकावली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यानंतर रोहितने रिषभ पंतच्या करीअरचे काय होऊ शकते, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला तरी पंत हा कसोटी संघात बसत नाही, असे रोहितला म्हणायचे आहे का, ते जाणून घ्या...

सामन्यानंतर रोहितला पंतबाबत प्रश्न विचारला गेला, त्यावर रोहित म्हणाला की, " पंत हा एक गुणवान खेळाडू आहे. यापूर्वीही त्याची कामगिरी साऱ्यांनी पाहिली आहे. प्रत्येकाला तो संघाचा एक भाग असावा असे वाटू शकते. पण सध्याच्या घडीला तो संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे या घडीला त्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षणावर अधिक भर देणे गरजेचे आहे. माझ्यामते सहाय्यक प्रशिक्षक पंतकडून काही गोष्टी घोटवून घेतील, असा मला विश्वास आहे."

या सामन्यात वृद्धिमान साहाने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. साहाबाबत रोहित म्हणाला की, " साहाकडून या सामन्यात दमदार यष्टीरक्षण पाहायला मिळाले. कारण या सामन्यातील खेळपट्टीवर यष्टीरक्षण करणे, सोपे नव्हते. कारण काहीवेळा चेंडू संथ येत होता, तर काहीवेळा खाली राहत होता, तर कधीकधी उंच उडत होता. त्यामुळे या सामन्यात यष्टीरक्षण करणे सोपे नव्हते. साहाने परिस्थितीनुसार यष्टीरक्षण केले आणि त्यामुळेच विजयात साहाचाही मोठा वाटा आहे."

पंत आणि साहा यांच्यातील संबंध कसे आहेत, यावरही रोहितने प्रकाशझोत टाकला आहे. तो म्हणाला की, " वेस्ट इंडिज दौऱ्यात पंत हा संघात होता, पण साहा संघाबाहेर होता. पण पंत सरावाला आला की त्याला प्रथम भेटणारा व्यक्ती हा साहा होता. साहाने बऱ्याच वेळा पंतला मदत केली आहे."

टॅग्स :रोहित शर्मारिषभ पंतवृद्धिमान साहाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका