Join us  

भारताचा २८ दिवसांचा दौरा; आफ्रिकेचा ३ वर्षाचा तोटा भरून काढणार अन् पुढील ३ वर्ष वित्तीय आधार देणार

India vs South Africa series - टीम इंडिया ही जागतिक क्रिकेटची महसत्ता आहे... भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 5:57 PM

Open in App

India vs South Africa series - टीम इंडिया ही जागतिक क्रिकेटची महसत्ता आहे... भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध मालिका खेळण्यासाठी किंवा मालिकेच्या आयोजनासाठी अनेक संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. कारण, टीम इंडियाचा आणि स्टार क्रिकेटपटूंचा जगभरात खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि यजमानपद भूषविणाऱ्या संघाला त्यातून प्रचंड आर्थिक फायदा होतो. आता भारतीय संघ २८ दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि भारताच्या या दौऱ्यातून क्रिकेट दक्षिण आफ्रिका मागील ३ वर्षांतील त्यांचा तोटा तर भरून काढणार आहेच, शिवाय पुढील ३ वर्षाचा नफाही कमावणार आहे.

३ ओपनर, ६ मिडल ऑडर फलंदाज, ४ स्पिनर, ३ फास्टर! प्लेइंग ११ निवडताना टीम इंडियाची दमछाक

भारताविरुद्धच्या मालिकेची जेवढी आतुरता चाहत्यांना आहे, त्यापेक्षा अधिक ती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेलाही ( CSA) आहे. १० डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. कोरोनामुळे डिसेंबर २०२१ पासून भारताने दौरा केलेला नाही. पण, आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यामुळे CSA ला ६.३ मिलियन डॉलर म्हणजेच ५२ कोटी, ५३ लाख, ५४,१६५ रुपयांची वित्तीय तूट भरून काढता येणार आहे. भारताच्या २८ दिवसांच्या दौऱ्यातून क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला ६८.७ मिलियन डॉलरचा म्हणजेच जवळपास ५७३ कोटींचा नफा होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दौरा वित्तीय तूटच भरून काढणार नाही, तर पुढील ३ वर्ष आफ्रिकेला आधारही देणार आहे. सीनियर संघाशिवाय भारत अ संघही दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. 

कमाईची विभागवारीएकूण कमाई - ५७२ कोटी, ८७ लाख ७२,७७५ प्रती सामना - ७१ कोटी, ७१ लाख ५४,४३० प्रीत दिवस - १९ कोटी, ९ लाख ६३,२१४  

ट्वेंटी-२० मालिका 

१० डिसेंबर - डर्बन, सायंकाळी ७.३० वाजल्यापासून१२ डिसेंबर - जीकबेर्हा, रात्री ८.३० वाजल्यापासून१४ डिसेंबर - जोहान्सबर्ग, रात्री ८.३० वाजल्यापासून

वन डे मालिका१७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून१९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून

कसोटी मालिका२६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाबीसीसीआय