Join us  

टीम इंडिया करणार संघात बदल; दोन खेळाडूंना डच्चू मिळणं जवळपास नक्की

तिसरी टी२० जिंकणं भारतासाठी अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 9:13 PM

Open in App

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेकडून सलग दोन टी२० सामने गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान आहे. दक्षिण आफ्रिकेने दिल्ली आणि कटकमधील सामने सहज जिंकले, पण आता विशाखापट्टणममध्ये टीम इंडिया पुनरागमन करू शकेल का? या प्रश्नाचे उत्तर तिसऱ्या सामन्यानंतरच कळेल. मात्र, हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला अधिक परिश्रमासह संघात काही बदलांची गरज आहे. टीम इंडिया तिसऱ्या टी२० मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते, असं सांगितलं जात असून दोन खेळाडूंचा पत्ता कट होणं जवळपास निश्चित आहे.

टीम इंडिया फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आफ्रिकेपेक्षा कमकुवत दिसत आहे. दक्षिण आफ्रिका उत्कृष्ट क्रिकेट खेळत असून भारतीय संघाला पुनरागमन करण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल होऊ शकतात, ते पाहूया.

संघात दोन बदल निश्चित

टीम इंडियामध्ये दोन बदल निश्चित असल्याचे मानले जात आहेत. ऋतुराज गायकवाड दोन सामन्यांत फ्लॉप ठरला आहे. तसेच अक्षर पटेलची कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही. हे दोन्ही खेळाडू आता संघाबाहेर होऊ शकतात. अक्षर पटेलच्या जागी टीम इंडिया व्यंकटेश अय्यरला संधी देऊ शकते. कारण फलंदाजीसोबतच तो मध्यमगती गोलंदाजीही करू शकतो. याशिवाय, ऋतुराज गायकवाडला विश्रांती देऊन त्याजागी दीपक हुडाला संधी मिळू शकते. याशिवाय, गोलंदाजीतील धार वाढवण्यासाठी एखादा गोलंदाज कमी करून त्याजागी उमरान मलिकला संधी देण्याचा निर्णय चांगला ठरू शकेल.

असा असू शकतो अंतिम संघ- इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, व्यंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान / उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.

तिसरा टी२० सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला दमदार खेळ करावा लागणार आहे. यासोबतच आपली रणनितीही बदलावी लागू शकते. दक्षिण आफ्रिकेचा संघ फिरकीपटूं विरोधात चांगला खेळ करत असल्याने मध्यमगती गोलंदाजांचे आक्रमण आवश्यक असेल. त्याचबरोबर भारतीय फलंदाजांनाही आपली कामगिरी सुधारावी लागेल.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिकाटी-20 क्रिकेट
Open in App