Join us  

India vs South Africa Test Match: कोहलीला सूर गवसेना! शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणण्यास पुन्हा अपयश, स्वस्तात माघारी

India vs South Africa Test Match Updates: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ सेंच्युरियनवर आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 7:51 PM

Open in App

India vs South Africa Test Match Updates: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ सेंच्युरियनवर आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून भारतीय संघानं फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली आहे. सलामीवीर केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी शतकी भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. मयांक अग्रवाल ६० धावांवर बाद झाला. तर केएल राहुल शतकाच्या जवळ पोहोचला आहे. पण कर्णधार विराट कोहलीचा शतकी खेळीचा दुष्काळ काही अद्याप संपुष्टात आलेला नाही. कारण आजच्या सामन्यातही कोहली स्वस्तात बाद झाला आहे. विराट कोहली ३५ धावा करुन माघारी परतला आहे. 

भारतीय क्रिकेट संघाच्या तिन्ही प्रकारात नेतृत्त्व करत असल्यामुळे दबावाचं ओझं वाढल्याचं आणि फलंदाजीकडे अधिक लक्ष देण्यांचा कारण देत कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडलं. त्यानंतर कोहलीला आता एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदाच्या जबाबदारीतूनही मोकळं करण्यात आलं आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या आजच्या खेळीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. कोहलीनं सामन्यात सावध सुरुवात करत मैदानात जम बसवण्याचाही प्रयत्न केला. पण द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी निगीडीच्या जाळ्यात कोहली फसला आणि कव्हर ड्राइव्ह मारण्याच्या नादात बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळला. यात चेंडू कोहलीच्या बॅटची कडा घेत थेट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या मुल्डरच्या ओंझळीत विसावला आणि कर्णधार कोहलीला बाहेरचा रस्ता धरावा लागला. कोहलीनं ९४ चेंडूत ३५ धावा केल्या. यात ४ चौकारांचा समावेश आहे. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App