IND vs SA Live Scorecard : विराट कोहलीने ( Virat Kohli) राखून ठेवलेली महत्त्वपूर्ण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळली. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारताच्या आघाडीच्या फळीने चुकीचे फटके खेचून विकेट फेकल्या. पण, विराट व अक्षर पटेल चतुराईने खेळले आणि दोघांच्या ७२ धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. अक्षर दुर्दैविरित्या रन आऊट झाल्यानंतर विराटने गिअर बदलला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले
रोहित शर्मा ( ९) , रिषभ पंत ( ०) व सूर्यकुमार यादव ( ३) हे ३४ धावांत माघारी परतले. विराट व अक्षर पटेल यांनी भारताचा डाव सावरला आणि चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कोहलीने ४,४,२,४ असे फटके खेचून इरादा स्पष्ट केला. दुसऱ्या षटकात केशव महाराजने भारताला दोन धक्के दिले. कागिसो रबाडाने सुर्याला बाद करून भारताला ३४ धावांत तिसरा धक्का दिला. अक्षर पटेलने मिळालेल्या बढतीचा फायदा उचलताना ४ खणखणीत षटकार खेचले. विराट अन् अक्षरची ५४ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी दुर्दैवीरित्या संपुष्टात आली. क्विंटन डी कॉकच्या थ्रोवर अक्षर ( ४७ धावा, ३१ चेंडू, १ चौकार व ४ षटकार) रन आऊट झाला.