India vs Sri Lanka 1st ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरूवात होत आहे. टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीतील सर्वोत्तम खेळाडू शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अनुभवी श्रीलंका संघाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियातील रिक्त जागांवर दावा सांगण्यासाठी धवन, पृथ्वी शॉसह या दौऱ्यावर गेलेल्या प्रत्येकाला समान संधी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असणार आहे. राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखी प्रथमच टीम इंडियाचा वरिष्ठ संघ खेळणार आहे. त्यामुळे पहिल्या वन डेत धवन व द्रविड अंतिम ११मध्ये कोणाची निवड करतात याची उत्सुकता लागली आहे.
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याचा प्रवास शाळांमधून शिकवला जाणार; 'कॅप्टन कूल'वरील धड्याचा Photo Viral
टीम इंडियाला अंतिम ११च्या निवडीसाठी इशान किशन/संजू सॅमसन आणि के गौथम/कृणाल पांड्या यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. शिखर धवनसह सलामीला पृथ्वी शॉ येणं पक्के आहे. विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीनं सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. त्याशिवाय हार्दिक पांड्या व भुवनेश्वर कुमार यांचेही अंतिम ११मधील स्थान पक्के आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी देवदत्त पडीक्कल/ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव/मनीष पांडे यांच्यात चढाओढ आहे.
फिरकीपटू म्हणून कृष्णप्पा गौथम आणि कृणाल पांड्या यांच्यापैकी एकाचीच निवड करावी लागणार आहे. कृणालकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे, त्यामुळे त्याचे पारडे जड आहे. त्यांच्याशिवाय राहुल चहर व युजवेंद्र चहल हेही पर्याय आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज यासाठी संजू सॅमसन व इशान किशन यांच्यात स्पर्धा आहे.
वन डे मालिका पहिली वन डे - १८ जुलै, दुपारी ३ वाजल्यापासूनदुसरी वन डे - २० जुलै, दुपारी ३ वाजल्यापासूनतिसरी वन डे - २३ जुलै, दुपारी ३ वाजल्यापासून
भारतीय संघ - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीयानेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग
श्रीलंका संघ - दासून शनाका ( कर्णधार), धनंजया डी सिल्व्हा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पाथूम निस्संका, चरीथ असालंका, वनिंदू हसरंगा, आशेन बंदारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडीस, चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमिरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजया लक्षण, इशान जयरत्ने, प्रविण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसून रजिथा, लाहिरू कुमारा, इसुरू उदाना
सर्व सामने कोलंबो येथे खेळवण्यात येतील
थेट प्रक्षेपण - सोनी सिक्स इंग्लिश व सोनी टेन ३ हिंदी