India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं धडाकेबाज खेळी करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. उभ्या उभ्यानं खणखणीत चौकार खेचून त्यानं टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करून दिली. पृथ्वी माघारी परतल्यानंतर पदार्पणवीर इशान किशनची चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. त्यानं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या.
वीरूच्या पावलावर पृथ्वी शॉचे पाऊल; २००८नंतर टीम इंडियाच्या ओपनरची भारी कामगिरी, Video
लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीनं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला. त्यानं पहिल्या विकेटसाठी शिखर धवन ५८ धावांची भागीदारी केली. यात पृथ्वीनं २४ चेंडूंत ९ चौकारासह ४३ धावा केल्या.पृथ्वी माघारी परतल्यानं आलेल्या पदार्पणवीर इशान किशननं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. इशान किशनने वन डे पदार्पणात अर्धशतक झळकावले. त्यानं ३३ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५२* धावा केल्या. कर्णधार शिखर धवन नॉन स्ट्रायकर एंडवरून इशानची आतषबाजी पाहत होता.
इशाननं वन डे व ट्वेंटी-२० संघात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. रॉबिन उथप्पानं पदार्पणाच्या डावात हा पराक्रम केला होता. वाढदिवसाला पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी भारताकडून गुरशरण सिंग यांनी १९९०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वाढदिवसाला वन डे संघात पदार्पण केले होते. शिखरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करताना वन डे क्रिकेटमध्येही ६ हजार धावा पूर्ण केल्या. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो पाचवा सलामीवीर आणि १०वा फलंदाज ठरला.