India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रथमच एकत्र खेळणाऱ्या युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी श्रीलंकेला धक्के दिले. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर व हार्दिक पांड्या हे जलदगती गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार शिखर धवननं ( Shikhar Dhawan) फिरकी गोलंदाजांना पाचारण केले. चहलनं पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला, त्यानंतर कुलदीपनं एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या. कर्णधार धवननं अफलातून झेल टिपत कुलदीपला विकेट मिळवून दिली. या सामन्यातून प्रथमच कर्णधारपद भूषविणारा धवन हा भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांची ४९ धावांची भागीदारी चहलनं संपुष्टात आणली. त्यानंतर कुलदीपनं भानुका व भानुका राजपक्षा यांना एकाच षटकात माघारी पाठवले. कृणाल पांड्यानं चौथा धक्का दिला. २५ षटकांत श्रीलंकेच्या ४ बाद ११७ धावा झाल्या आहेत.टीम इंडियानं आजच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव व इशान किशन यांना वन डे संघात पदार्पणाची संधी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत इशान व सुर्या यांनी एकत्रच ट्वेंटी-२० संघात पदार्पण केलं होतं अन् आज वन डे संघातही ही दोघं सोबतच पदार्पण करत आहेत.
टीम इंडियाला मोठा धक्का, सामन्यापूर्वीच प्रमुख खेळाडूला झाली दुखापत; BCCIकडून मोठे अपडेट्स!
पाहा विकेट्स...
२०१५नंतर टीम इंडिया प्रथमच विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याशिवाय मैदानावर उतरली आहे. ( The last time India played an ODI without Rohit, Kohli, and Dhoni in the XI was against Zimbabwe in 2015).
शिखर धवनचा हा १४२वा वन डे सामना आहे आणि त्याला प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अनिल कुंबळेला २१७ आणि रोहित शर्माला १७१ सामन्यानंतर अशी संधी मिळाली होती. राहुल द्रविडला १३८ सामन्यानंतर नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता.
भारताच्या वन डे संघाचे नेतृत्व करणारा धवन हा वयस्कर कर्णधार ठरला. धवन हा ३५ वर्ष व २२५ दिवसांचा आहे. यापूर्वी मोहिंदर अमरनाथ यांनी ३४ वर्ष व ३७ दिवसांचे असताना टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले होते. ( At 35 years and 225 days, Shikhar Dhawan overtakes Mohinder Amarnath (34y 37d) to become the oldest cricketer to make his captaincy debut for India in ODIs)
Web Title: India vs Sri Lanka 1st ODI, Live : Shikhar Dhawan become the oldest cricketer to make his captaincy debut for India in ODIs, Take brilliant catch, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.