ठळक मुद्दे४९ व ५०व्या षटकात धावा चोपून त्यांनी ९ बाद २६२ धावा केल्या. चमिका करुणारत्ने ( ४३*) व दुश्मंथा चमिरा ( १३) यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपल्या.
India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : श्रीलंकेच्या चमिका करुणारत्ने व दुश्मंथा चमिरा यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपून काढताना टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं करण्यात यश मिळवला. श्रीलंकेचा संघ जेमतेम २२५ धावांपर्यंत मजल मारेल असे वाटत असताना त्यांनी ९ बाद २६२ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही आणि एकाही जोडीची अर्धशतकी भागीदारी झाली नाही. श्रीलंकेनं या कामगिरीसह २००१ सालचा ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला.
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांची ४९ धावांची भागीदारी युजवेंद्र चहलनं संपुष्टात आणली. त्यानंतर कुलदीप यादवनं भानुका व भानुका राजपक्षा यांना एकाच षटकात माघारी पाठवले. कृणाल पांड्यानं चौथा धक्का दिला. चरिथा असालंका व वनिंदू हसरंगा हे डोईजड होऊ पाहणारे फलंदाज दीपक चहरच्या गोलंदाजीवर सहज बाद झाले. चहरला यांची विकेट मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही.
कर्णधार दासून शनाका संघर्ष करत होता, परंतु चहलनं त्याच्या अखेरच्या षटकात हाही अडथला दूर केला. शनाका ३९ धावांवर माघारी परतला. चहलनं १० षटकांत ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्यानं १० षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली. अखेरच्या षटकांत धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेनं विकेट फेकल्या. पण, ४९ व ५०व्या षटकात धावा चोपून त्यांनी ९ बाद २६२ धावा केल्या. चमिका करुणारत्ने ( ४३*) व दुश्मंथा चमिरा ( १३) यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपल्या.
एकाचेही अर्धशतक नाही आणि एकाही जोडीची अर्धशतकी भागीदारी नसतानाही संघानं केलेल्या या सर्वोत्तम धावा ठरल्या. ( Highest ODI total without any 50+ score and without any 50+ partnership). यापूर्वी ऑस्ट्रेलियानं २००१मध्ये सिडनीत ९ बाद २५३ धावा केल्या होत्या.
Web Title: India vs Sri Lanka 1st ODI, Live : Sri Lanka team registered highest ODI total without any 50+ score and without any 50+ partnership
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.