IND vs SL 1st ODI : 'INDIA B' कडून श्रीलंकेचे वस्त्रहरण; पृथ्वी, इशान, शिखर प्रत्येकानं नोंदवले भारी विक्रम!

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:08 PM2021-07-18T22:08:30+5:302021-07-18T22:23:09+5:30

whatsapp join usJoin us
India vs Sri Lanka 1st ODI, Live : TeamIndia beat Sri Lanka by 7 wickets & take 1-0 lead in the series | IND vs SL 1st ODI : 'INDIA B' कडून श्रीलंकेचे वस्त्रहरण; पृथ्वी, इशान, शिखर प्रत्येकानं नोंदवले भारी विक्रम!

IND vs SL 1st ODI : 'INDIA B' कडून श्रीलंकेचे वस्त्रहरण; पृथ्वी, इशान, शिखर प्रत्येकानं नोंदवले भारी विक्रम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देएकाचेही अर्धशतक नाही आणि एकाही जोडीची अर्धशतकी भागीदारी नसतानाही संघानं केलेल्या या सर्वोत्तम धावा ठरल्या. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं २००१मध्ये सिडनीत ९ बाद २५३ धावा केल्या होत्या. इशाननं वन डे व ट्वेंटी-२० संघात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. रॉबिन उथप्पानं पदार्पणाच्या डावात हा पराक्रम केला होता.

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली.  मालिकेपूर्वी संघाला दुय्यम म्हणून संबोधणाऱ्या माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाची या निकालानंतर बोबडी वळली. रणतुंगाच्या म्हणण्यानुसार 'टीम इंडियाच्या B संघानं' श्रीलंकेचे २६३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानंही संयमानं खेळ करताना अर्धशतकासह अनेक विक्रमांचीही नोंद केली. 

शिखर धवननं कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात मोडला अजित वाडेकर यांचा १९७४ सालचा विक्रम

श्रीलंकेच्या चमिका करुणारत्ने  व दुश्मंथा चमिरा यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपून काढताना टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं करण्यात यश मिळवला. त्यांनी ९ बाद २६२ धावांचा डोंगर उभा केला. चरिथा असालंका ( ३८), कर्णधार दानूश शनाका ( ३९) यांनी समाधानकारक खेळ केला. चहलनं १० षटकांत ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्यानं १० षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली. चमिका करुणारत्ने ( ४३*) व दुश्मंथा चमिरा ( १३) यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपल्या. दीपक चहरनं ३७ धावांत २ बळी टिपले. कुलदीपनेही ४८ धावांत २ विकेट घेतल्या. 

बर्थ डे बॉय इशान किशनची आतषबाजी; पदार्पणाच्या सामन्यात केला एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम!

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीनं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला. त्यानं पहिल्या विकेटसाठी शिखर धवन ५८ धावांची भागीदारी केली. यात पृथ्वीनं २४ चेंडूंत ९ चौकारासह ४३ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या २० चेंडूंत पृथ्वीनं ३९ धावा चोपल्या. २००८मध्ये वीरूनं हाँगकाँगविरुद्ध ४१ धावा कुटल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय सलामीवीरानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.पृथ्वी माघारी परतल्यानं आलेल्या पदार्पणवीर इशान किशननं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला.  इशान किशनने वन डे पदार्पणात अर्धशतक झळकावले. त्यानं ३३ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५२* धावा केल्या. कर्णधार शिखर धवन नॉन स्ट्रायकर एंडवरून इशानची आतषबाजी पाहत होता. इशाननं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या. 

वीरूच्या पावलावर पृथ्वी शॉचे पाऊल; २००८नंतर टीम इंडियाच्या ओपनरची भारी कामगिरी, Video
 



 शिखर धवननं ९५ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ८६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव २० चेंडूंत ३१ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ३६.४ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य पार केले. टीम इंडियानं ७ विकेट्स व ८० चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

काय म्हणाला होता अर्जुन रणतुंगा?
''हा टीम इंडियाचा दुसऱ्या फळीचा संघ आहे आणि ते इथे आमचा अपमान करण्यासाठी आले आहेत. टेलिव्हिजन मार्केटींगसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या मालिकेला मान्यता दिली, त्यावरून  मी त्यांच्यावर टीका केली,''असे रणतुंगानं सांगितले.  ''भारतानं त्यांचा सर्वोत्तम संघ इंग्लंड दौऱ्यावर पाठवला आहे आणि श्रीलंकेसोबत खेळण्यासाठी दुय्यम संघ पाठवला आहे. त्यासाठी मी श्रीलंका बोर्डावरही टीका केली आहे,''असे रणतुंगा यानं सांगितले. 

Web Title: India vs Sri Lanka 1st ODI, Live : TeamIndia beat Sri Lanka by 7 wickets & take 1-0 lead in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.