धर्मशाला - आघाडीच्या फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीनंतर महेंद्रसिंह धोनीने मैदानात तग धरत निर्णायक अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. धोनीनं तळाच्या फलंदाजांच्या साथीनं भारतीय संघाची धावसंख्या शंभरीपार नेहली. धोनीनं कठीण परिस्थितीत केलेल्या 65 धावांच्या खेळीच्या बळावर भारतानं 112 धावापर्यंत मजल मारली. श्रीलंकेसमोर मोजक्याच 113 धावांचे आव्हान आहे. श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़ घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाची अवस्था दयनीय केली.
श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पहिल्याच सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला खातेही उघडता आले नाही. डावाच्या दुसऱ्या षटकात मॅथ्यूजने श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार रोहित शर्मालाही सुरंगा लकमलने बाद केले. त्यानंतर 18 चेंडूचा सामना करुन दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. सुरंगाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. हार्दिक पांड्या दोन चौकारांसह 10 आणि श्रेयस अय्यरने 1 चौकारासह 9 धावा केल्या. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधाराची सुत्रे साभांळणाऱ्या रोहित अवघ्या दोन धावांवर बाद झाला.
माजी कर्णधार धोनी आणि कुलदीप यादवनं भारताच्या नावावर होणारा लाजिरवाणा विक्रम होण्यापासून वाचवलं आहे. भारतानं 29 धावांत सात गडी गमावले होते. एकदिवसीय सामन्यात भारत सर्वाधिक नीचांकी धावसंख्येवर बाद होणार असे वाटत असतानाच धोनी-कुलदीप जोडीनं सयंमी फलंदाजी करत भारतीय संघाची लाज वाचवली. धोनी-कुलदीपनं आठव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीपनं 19 धावांची खेळी केली. धोनी सध्या 32 धावांवर खेळत आहे.
दिनेश कार्तिकच्या नावे ‘या’ खराब विक्रमाची नोंद
सलामीच्या एकदिवसीय सामन्यात दिनेश कार्तिकच्या नावे एका खराब विक्रमाची नोंद झाली. या सामन्यात दिनेश कार्तिकने 18 चेंडूचा सामना केला. तीन षटके फलंदाजी केल्यानंतरही त्याला खाते उघडता आले नाही. धर्मशालेच्या मैदानातील दिनेशची ही खेळी क्रिकेटच्या मैदानातील भारतीय फलंदाजाकडून झालेली सर्वात खराब कामगिरी आहे. सर्वाधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याचा विक्रम कार्तिकच्या नावे झाला. यापूर्वी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एकनाथ सोलकर यांना 16 चेंडूत खाते उघडता आले नव्हते. ओव्हलच्या मैदानातील भारतीय फलंदाजाने अधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याच्या खराब विक्रमाची नोंद झाली होती. कार्तिकने त्यांच्यापेक्षा एक चेंडू अधिक खेळत खराब विक्रम नोंदवला. याशिवाय भारताचा माजी कर्णधार सौरव गांगलीने कोलंबोच्या मैदानात श्रीलंकेविरुद्ध अशी खराब कामगिरी केली होती. गांगुलीला 16 चेंडूचा सामना केल्यानंतर एकही धावा करता आली नव्हती.
धोनीच्या सोळा हजार धावा -
धोनीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात 16 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावा पूर्ण करताच धोनीच्या नावार हा विक्रम झाला. धोनीआधी नुकतेच विराट कोहलीनं दिल्ली कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 16 हजार धावांचा पल्ला पार केला होता. धोनीने 483 व्या सामन्यात खेळताना 45.14 च्या सरासरीने 16 हजार धावा केल्या आहेत. यात त्याची १६ शतके तर 100 अर्धशतके सामील आहेत.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यात ३४,३५७ धावा केल्या आहेत.
दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 3-0 असे निभ्रळ यश मिळवल्यास आयसीसी एकदिवसीय सांघिक क्रमवारीत भारत अव्वल स्थान गाठू शकेल. आयसीसी क्रमवारीतील सुधारणेसाठी भारताच्या दृष्टिने ही मालिका महत्त्वाची ठरेल. दुसरीकडे कसोटीतील अपयशाची परतफेड करण्यासाठी श्रीलंकन खेळाडूंसमोर आव्हान असेल. सलग पाच द्विपक्षीय मालिका जिंकणारा भारतीय संघ ही मालिका ३-० ने जिंकल्यास द. आफ्रिकेला मागे सारून वन-डेतही अव्वल स्थानावर विराजमान होईल. मागच्या वन-डे मालिकेत भारताने लंकेला ५-० असे नमविले होते. विराटच्या अनुपस्थितीत रोहित, कार्तिक, धोनी, केदार जाधव हे फलंदाजीत योगदान देण्यास सज्ज आहेत.