भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला चाहत्याकडून अनोखं गिफ्ट मिळालं. चाहत्यानं जुन्या मोबाईल आणि वायर्सच्या मदतीनं तयार केलेलं विराटचं चित्र गिफ्ट म्हणून दिले. राहुल असे या चाहत्याचे नाव आहे. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना गुवाहाटी येथे होणार असल्याचे समजल्यावर राहुलनं हे चित्र तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानं तीन दिवस व तीन रात्रीत हे चित्र तयार केले.
कोहलीनं या चित्रावर ऑटोग्राफ दिले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नववर्षात भारताचा पहिल्याच मालिकेत श्रीलंकेचा सामना करायचा आहे. टीम इंडियानं 2019च्या अखेरच्या ट्वेंटी-20 मालिकेत वेस्ट इंडिजवर 2-1 असा विजय मिळवला होता. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मागील पाच सामन्यांत श्रीलंकेला टीम इंडियाला नमवता आलेले नाही.
या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते आणि या मालिकेतून ते कमबॅक करत आहेत. धवनच्या उपस्थितीत लोकेश राहुलनं सलामीची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
OMG : विराट कोहलीला दुखापत; पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली
टीम इंडिया - विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
श्रीलंका - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा.